संगमनेर | नगर सह्याद्री महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील सरकारने मंत्री, आमदार, खासदार, शासकीय अधिकारी, न्य...
संगमनेर | नगर सह्याद्री
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील सरकारने मंत्री, आमदार, खासदार, शासकीय अधिकारी, न्यायपालिकेचे अधिकारी, विशेष सरकारी पाहुणे यांच्यासाठी ठिक ठिकाणी सुसज्ज अशा शासकीय विश्रामगृहाची निर्मिती केली. येथे या विशेष पाहुण्यांच्या राहण्यासाठी कर्मचारी व जेवणाची सोय व्हावी यासाठी एका विशेष सरकारी आचार्याची (स्वयंपाकी) सोय केली. मात्र संगमनेर शहरातील सुसज्ज अशा शासकीय विश्रामगृहात मात्र मागील अनेक वर्षापासून या स्वयंपायाची प्रचंड मनमानी व लुटमार सुरू असून त्याने या शासकीय वास्तुला खासगी खानावळ व दारू मटण शौकीनांचा अड्डा बनविला आहे.
रोज याठिकाणी अशासकीय नागरीकांच्या पार्ट्या सुरू असून रात्री अपरात्री तर नको ते उद्योग येथे चालत असल्याचा संशय अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र हे सर्व येथील वरिष्ठ अधिकारी डोळे बंद करून पहात असल्याने संपूर्ण यंत्रणेलाच किड लागल्याची शंका व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील सर्वात सुसज्ज व चांगले विश्रामगृह म्हणून संगमनेरचे शासकीय विश्रामगृहाकडे पाहिले जाते. परंतु या विश्रामगृहाला बदनाम करण्याचे काम येथील खानसाँ करत करीत आहे. येथील डायनिंग हॉलमध्ये चालणर्या खासगी पार्टीत चालणारे एसी, लाईट, पंखे, पाणी याचे बील सरकार भरते मात्र पैसे कमावतो हा खानसामा. तसेच या पार्ट्या केवळ शाकाहारी व शुध्दीतच होत नसून मद्याचे खंबेच्या खंबे रिचवत मटणावर ताव मारला जातो. याचे पुरावे म्हणून या शासकीय आवारात अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या आढळून येतात.
दुसरीकडे याठिकाणी जो व्यक्ती वास्तव्य करणार आहे किंवा जेवण करणार आहे त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात. परंतु अनेक वेळा एखाद्या खासगी संघटनांचे, पक्षाचे कार्यकर्ते, स्वयंघोषित पुढारी, अधिकार्यांचे नातेवाईक जणू आपल्या हक्काची जागा असल्यासारखे येथे पडून असतात. त्यांच्याकडून चांगली टिप किंवा जेवणाची ऑर्डर मिळत असल्याने त्यांना रान मोकळे करून दिले जाते. गैर कायद्याने येथील व्हिआपी सुटचा वापर केला जातो. या ठिकाणी कोण येतोय कोण राहतोय, कोण कुणाला घेऊन राहतोय याचा कुणालाच थांगपत्ता नाही. येथील शासकीय खानसामा हा येथेच खानावळ चालवत नाही तर बाहेर डबे पुरवतो व त्यासाठी हजारो रुपये अनाधिकृत पणे कमवत आहे. या डब्यांमध्ये अधिकार्याच्याही वाटा असल्याचे नाकारता येत नाही. आणि सुविधा तर सर्व शासकीय पुरवतो. सदर वास्तु ही शासकीय आहे म्हणून सर्वात सुरक्षित आहे.
या ठिकाणी काहीही उद्योग केले तर पोलीस धाड पडणार नाही याची खात्री असल्याने बिनदिक्कतपणे याच्या मर्जीने सर्व सुरळीत चालू असते. पगार, जागा शासनाची आणि कमाई मात्र या स्वयंपायाची. हे सत्र थांबून या वास्तुची प्रतिष्ठा जपावी, व गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या या आचार्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहे.
COMMENTS