पुणे। नगर सहयाद्री - प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील म्हटलं तर चर्चा होणारच ना. राज्यात सध्या नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव चांगलंच गाजत आहे...
पुणे। नगर सहयाद्री -
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील म्हटलं तर चर्चा होणारच ना. राज्यात सध्या नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव चांगलंच गाजत आहे. यात्रा असो किंवा पुढाऱ्यांचा वाढदिवस गौतमी पाटीलचा कार्यक्रम आवर्जून आयोजित केला जात आहे. अशातच पुण्यातील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली असताना देखील कार्यक्रम घेतल्यानं पुण्यातील भोसरी पोलीस ठाण्यात बर्थडे बॉयसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडीत अमित लांडेच्या वाढदिवसानिमित्त लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली असताना देखील अमित लांडे यांनी जाहीर कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित लांडेसह आयोजक मयुर रानवडे अशा दोघांवर परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गौतमीने आपल्या नृत्याने महिला आणि तरुण-तरुणींची मने जिंकली. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लहान मुलांनादेखील नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील गौतमीच्या कार्यक्रमात लहान मुलेही थिरकलेले पाहायला मिळाले. पिंपरी चिंडवडमधील गौतमीचा कार्यक्रम गोंधळाविना पार पडला.
COMMENTS