मुंबई। नगर सहयाद्री - महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार आहे.शिवसेना खासदार संजय राऊत हे १० जूनपूर्वी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्ध...
मुंबई। नगर सहयाद्री -
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार आहे.शिवसेना खासदार संजय राऊत हे १० जूनपूर्वी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. असा खळबळजनक दावा भाजप नेते आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, नितेश राणे म्हणाले,पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर संजय राऊतला बसायचे होते. त्यासाठी ते सातत्याने शरद पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे ४ वाजता संजय राऊत सिल्व्हर ओकवर गेले. उद्धव ठाकरे सापाला दूध पाजत आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर यांचे मनसुबे कळतील.
महाराष्ट्राच्या राजकारणात हा भूकंप होणार आहे. १० जूनच्या आधी किंवा राष्ट्रवादीच्या वर्धापण दिनी संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याबद्दलच्या त्यांच्या बैठका झाल्या आहेत. मला ही माहिती सूत्रांनी दिली आहे,असा खळबळजनक गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे.
COMMENTS