२० वर्षापासून ग्रामपंचायतीत तर १० वर्षापासून सोसायटीत पदाधिकारी पारनेर | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांचे विश्वासू...
२० वर्षापासून ग्रामपंचायतीत तर १० वर्षापासून सोसायटीत पदाधिकारी
पारनेर | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांचे विश्वासू राजेंद्र शिंदे यांची हंगा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बुधवारी तिसर्यांना बिनविरोध निवड झाली. आमदार नीलेश लंके व दिपक लंके यांनी शिंदे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हंगे ग्रामपंचायतीचे सरपंच जगदीप साठे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदाची निवड करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीचे बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सरपंचपदासाठी राजेंद्र शिंदे यांनी आपला अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत केवळ शिंदे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहिर केले.
आमदार लंकेच्या नावाला साजेसे काम करणार
पारनेर तालुयातील हंगा ग्रामपंचायत ही आमदार नीलेश लंके यांच्या गावची ग्रामपंचायत असल्याने त्यांच्या कामाचा राज्यात व जिल्हात जो नावलौकिक आहे त्यांच्या नावाला साजेसे काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र शिंदे यांनी सांगितले नीलेश लंके हे आमदार नसताना आपण सरपंच म्हणून काम पाहिलेले आहे. आज मात्र लंके हे विधानसभेत पारनेर- नगर मतदारसंघाचे आमदार म्हणून काम पाहत आहेत. गेल्या तिन-साडेतिन वर्षाच्या कालखंडात त्यांची ओळख संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात झाली आहे. आमदार लंके यांच्या गावचा सरपंच म्हणून माझी जबाबदार वाढली असून आ. लंके यांच्या लौकिकास साजेसा कारभार आपण करणार आहोत. - राजेंद्र शिंदे, नवविर्वाचित सरपंच, हंगा
शिंदे हे आमदार नीलेश लंके यांचे विश्वासू सहकारी आहेत. गेल्या २० वर्षापासून ते ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून कार्यरत असून त्यांनी आजवर दोनदा सरपंच म्हणून काम पाहिले आहे. उपसरपंच म्हणून काम पाहणार्या शिंदे यांच्या पत्नीनेही सरपंच म्हणून गावाचा कारभार पाहिला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून शिंदे हे श्रीकृष्ण हंगा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक आहेत. सेवा संस्थेचे चेअरमन म्हणूनही शिंदे यांनी काम पाहिले आहे. बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार नीलेश लंके यांनी शिंदे यांचा सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दीपक लंके यांनीही शिंदे यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना शिंदे यांनी सर्व सदस्यांना धन्यवाद देत ग्रामपंचायतीमध्ये तिस-यांदा सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिल्याबददल कृतज्ञता व्यक्त केली. सदस्यांनी टाकलेल्या विश्वासास तडा जाउ न देता आदर्श कारभार करू अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. आमदार निलेश लंके यांनी २० वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायत व सेवा संस्थेमध्ये काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करणार असल्याचे सरपंच शिंदे यांनी सांगितले.
COMMENTS