नंदुरबार। नगर सहयाद्री - नंदुरबार जिल्ह्यामधून एक मोठं वृत्त समोर आल आहे. चक्रीवादळाने हैदोस घातला आहे. ३५ पेक्षा जास्त आदिवासी कुटूंबाच्या ...
नंदुरबार। नगर सहयाद्री -
नंदुरबार जिल्ह्यामधून एक मोठं वृत्त समोर आल आहे. चक्रीवादळाने हैदोस घातला आहे. ३५ पेक्षा जास्त आदिवासी कुटूंबाच्या घरांचे नुकसान झालं आहे. अनेक घरांचे पत्रे देखील अशा वादळाने उडाले असून आदिवासी कुटुंब हे आता उघड्यावर आले आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रापापुर परिसरात आज झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला त्यातच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक झाडे ही कोलमडून पडले आहेत.घरात साठवून ठेवलेला धान्य इतर उपयोगी वस्तू हे पूर्ण पाण्यात भिजली आहेत.चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी शिरलं आहे.
चक्रीवादळाने अनेक घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आदिवासी कुटुंब हे आता उघड्यावर आले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्याने आदिवासी हताश झाले आहेत. वादळी वाऱ्यांमुळे घरांचे आणि विजेचा खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान विजेचे खांब कोसळल्याने परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
COMMENTS