निघोज | नगर सह्याद्री मी एक दिवस देशाचा पंतप्रधान होउन शिरुरला हेलिकॉप्टरमधून येईल असा ठाम विश्वास माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्...
निघोज | नगर सह्याद्री
मी एक दिवस देशाचा पंतप्रधान होउन शिरुरला हेलिकॉप्टरमधून येईल असा ठाम विश्वास माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे शिरूर तालुका अध्यक्ष शिवाजीराव कु-हाडे व त्यांच्या सहकार्यांनी शिरुर येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. पारनेर तालुक्यातील समाजबांधव व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहिले होते. पक्षाचे राज्य शाखेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
जानकर म्हणाले, आपल्या मुलांनी खासदार आमदार झाले पाहिजे, एम पी एस सी,यु पी एस सी,आय पी एस परिक्षा उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी, एस पी वरिष्ठ अधिकारी झाले पाहिजे, ही जिद्द प्रत्येकाने ठेवण्याची गरज आहे. मंत्री म्हणून काम करीत असताना सर्वसामान्य जनतेच्या हितार्थ धोरणे राबवताना मंत्रालयातील अधिकारी मोठी आडचण निर्माण करतात.
मुलांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे तरच सर्वसामान्य जनता असो की कष्टकरी शेतकरी यांना न्याय देण्याची भूमिका घेता येईल. महाराष्ट्रातील मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी त्यांची आपण दिल्ली येथे सर्व व्यवस्था करणार असून आपणही पंतप्रधान होण्याचे स्वप्न पहात असून ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून याच शिरुरला हेलिकॉप्टरमधून येणार असल्याची जिद्द त्यांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS