पत्नीची पती विरूद्ध फिर्याद | आरोपी बापाला चार दिवसाची पोलिस कोठडी सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील गटेवाडी येथील रविंद काळे यांनी दार...
पत्नीची पती विरूद्ध फिर्याद | आरोपी बापाला चार दिवसाची पोलिस कोठडी
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील गटेवाडी येथील रविंद काळे यांनी दारुच्या नशेत पत्नीला मारहाण करत आसताना सोडवण्यासाठी आलेल्या आपल्या दोन मुलांवर चाकुने वार करत जखमी केले. आरोपी काळे यास पारनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत रेखा रविंद काळे (रा. गटेवाडी ता. पारनेर) यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवार दि. २२ मे रोजी सायंकाळी ६ वाजेचे सुमारास पती रविंद्र हे दारु पेवून घरी आले व मला विनाकारण शिवीगाळ करून मारहाण करू लागल्याने मी माझ्या मुलांना घेवून माझे दिर आदीक अर्जुन काळे यांचे घरी घेवून आले. त्यानंतर काही वेळात पती रविंद्र हे आमचे मागोमागे येथे दीराचे घरी आले. व मला तेथेही मारहाण करू लागले. तेव्हा दोन्ही मुलांनी आईला मारु नका असे सांगितले. याचा त्यांना राग आल्याने दोन्ही मुले व मला शिवीगाळ करून मारहाण करू लागले.
त्यावेळेस मुले पतीला विरोध करीत असताना तुमचा एकएकाचा खुन करतो असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे खिशातून चाकू काढून दोन मुले अभय व अक्षय यांना छातीला व पोटाला जोरात मारून गंभीर जखमी केले. पती दारू पिलेले असल्याने आमच्या झालेल्या भांडणामध्ये त्यांचा तोल जावून ते खाली पडून त्यांच्या डोयाला देखील मार लागून जखमी झाले. दोन्ही मुलांना चाकूने मारहाण केल्याने गंभीर जखमी झाल्याने मुलांना ताबडतोब सुप्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये औषधोपचारकानी घेवून गेलो.
तेथे डॉटरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील औषधोपचार कामी अहमदनगर येथे घेवून जाण्यास सांगितल्याने आम्ही तात्काळ त्यांना नगरमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये औषधोपचार कामी दाखल केले. सुपा पोलिसांनी रेखा काळे यांच्या फिर्यादीवरुन रविंद काळे यांच्या विरुध्द ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला असुन आरोपी रविंद्र काळे यास मंगळवारी पारनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २६ मे पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पुढील तपास सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी करत आहेत. दोन्ही जखमींवर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
COMMENTS