मुंबई। नगर सहयाद्री - मुंबईच्या कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोर समजून जमावाने केलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ग...
मुंबई। नगर सहयाद्री -
मुंबईच्या कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोर समजून जमावाने केलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रविण शांताराम लहाने (29 वर्षे) असे जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, बोरिवली पूर्वेकडे वास्तव्यास असलेल्या भावाकडे सिन्नर येथून प्रवीण आला होता.बोरिवली परिसरात बुधवारी मध्यरात्री एकटाच फिरत असल्याचे स्थानिक रहिवाशांना आढळून आले. मात्र हा तरुण चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरून जमावाने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. जमावाने केलेल्या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला.
जमावातील व्यक्तीकडून एका व्यक्तीला मारहाण झाल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर गस्तीवर असलेल्या रात्रपाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी अवस्थेतील तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाला किंवा इतर कशामुळे झाला हे त्याच्या शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.
COMMENTS