छत्रपती संभाजी नगर।नगर सहयाद्री - प्रेमसंबंधातुन आंतरजातीय विवाह केलेल्या पत्नीस वर्षभरानंतर मुलगी होताच माहेरी सोडून देण्यात आल्याचा प्रका...
छत्रपती संभाजी नगर।नगर सहयाद्री -
प्रेमसंबंधातुन आंतरजातीय विवाह केलेल्या पत्नीस वर्षभरानंतर मुलगी होताच माहेरी सोडून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,पीडित महिलांचे शहरात वास्तव्यास असणाऱ्या अमेयकुमार सोबत प्रेमसंबंधामधून २४ मे २०२१ रोजी रजिस्टर पद्धतीने विवाह केला. पीडित महिला अनुसूचित जातीतील असल्यामुळे अमेयकुमारच्या कुटुंबांनी लग्नानंतर विरोध करत घरात घेण्यास नकार दिला. वारंवार तिला त्रास देत, फ्लॅट खाली करण्यास सांगितले. प्रेमसंबंधामधून पीडितेने १६ जुन २०२२ रोजी एका मुलीला जन्म दिला.
मुलगी झाल्याची माहिती सासरच्यांना झाल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा नांदवायला नेण्यास नकार दिला.पीडितेने क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठून चौघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. फिऱ्यादीनुसार पती अमेयकुमार नितीनचंद्र पाटील, सासरा नितीनचंद्र रामचंद्र पाटील यांच्यासह दोन महिलांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS