अहमदनगर | नगर सह्याद्री हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिव...
अहमदनगर | नगर सह्याद्री
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना नगर तालुका उपतालुकाप्रमुखपदी अंबादास कल्हापुरे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना नुकतेच जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी तालुकाप्रमुख संग्राम शेळके, उपजिल्हाप्रमुख आनंदा शेळके, युवा सेना तालुकाप्रमुख सचिन ठोंबरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे म्हणाले की, शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यात असून, हे सरकार अस्त्त्वित्वात आल्यापासून अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. जनसामान्य नागरिकास नजरेसमोर ठेवून सरकार काम करीत आहे. अनेक नवनवीन व चांगल्या योजना आता सुरू करण्यात आल्या आहेत. नुकताच सुरू करण्यात आलेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या उपक्रमास समाजातील तळागाळातील जनतेपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांचाच चांगला प्रतिसाद लाभत आहे. सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची आवड असणार्यांना शिवसेना नेहमीच संधी देते. अंबादास कल्हापुरे यांनी नगर तालुयात चांगले काम केले असून, त्यांच्या नियुक्तीचा पक्षाला चांगला लाभ होईल, असे ते म्हणाले.
नूतन उपतालुकाप्रमुख अंबादास कल्हापुरे म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आम्ही प्रेरित असून, त्यांना अभिप्रेत असलेले काम समाजात करीत आहोत. शिवसेनेने उपतालुकाप्रमुखपदाची जबाबदारी टाकली आहे. ही जबाबदारी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने निभावून पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करू, असे सांगितले.
COMMENTS