अहमदनगर | नगर सह्याद्री कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या जातीय दंगल, खुनाचा प्रयत्नातील फरार असलेला आरोपी गावठी रिव्हॉल्व्हर व जिवंत ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या जातीय दंगल, खुनाचा प्रयत्नातील फरार असलेला आरोपी गावठी रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतुससह तोफखाना पोलीसांनी पकडला आहे.
दि. २१ मे रोजी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या माहितीनुसार तारकपूर बस स्थानकासमोर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा बाळगून फिरत असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार घटनास्थळी पाठविले. तेथे एका मोटारसायकलवर बसलेला आरोपी दिसून आला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव अरबाज रज्जाक बागवान (वय २५, रा. पांचपिर चावडी) असे असल्याचे सांगीतले.
मोटारसायकलची झडती घेतली असता एक गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर ६ राऊंडचे सिलेंडर असलेला, ३ जिवंत काडतुसे, तीन विवीध क्रमांकांच्या मोटारसायकलच्या नंबर प्लेट व एक विना क्रमांकाची मोटारसायकल असा ८६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. हा आरोपी कोतवाली पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या जातीय दंगल, खुनाचा प्रयत्न आदी गुन्ह्यात फरार असल्याचे निष्पन्न झाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने व पो. नि. मधुकर साळवे यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, नितीन रणदिवे, पो. उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोहेकॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, पोना अविनाश वाकचौरे, धिरज खंडागळे, संदीप धामणे, वसीम पठाण, अहमद इनामदार, सचिन जगताप, सुरज वाबळे, सतिष त्रिभुवन, सतीष भवर, संदीप गिर्हे, गौतम सातपुते, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, तांत्रिक विभागाचे पोकॉ नितीन शिंदे यांनी केली.
COMMENTS