पुणे। नगर सहयाद्री - 'सबसे काटिल गौतमी पाटील' ही घोषणा सध्या सर्वत्र ऐकू येत आहे. गौतमी पाटीलच्या नृत्याने महाराष्ट्रातील तरुणाईला...
पुणे। नगर सहयाद्री -
'सबसे काटिल गौतमी पाटील' ही घोषणा सध्या सर्वत्र ऐकू येत आहे. गौतमी पाटीलच्या नृत्याने महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावले आहे. गौतमी पाटील सोशल मीडियावरही धुमाकूळ घालत आहेत.गौतमी पाटील सगळ्यांना तिच्या तालावर नाचवायला कोणतीही कसर सोडत नाही. अशात आता सातत्याने वादाच्या विळख्यात असलेली गौतमी पुन्हा एकदा नव्या वादात सापडली आहे. गौतमीने आतापर्यंत तिचं खरं आडनाव लपवून ठेवलं असून ती पाटील हे आडनाव लावून फिरत असल्याचा आरोप, मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, काल पुण्यात गौतमीच्या आडनावावरून एक बैठक पार पडली. बैठकीमध्ये गौतमीने आतापर्यंत तिचं खरं आडनाव लपवून ठेवलं असून ती पाटील हे आडनाव लावून फिरत असल्याचा आरोप, मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. यावेळी तिचं आडनाव पाटीन नसून चाबुकस्वार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
गौतमीचं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. त्यामुळे तिने पाटील हे आडनाव वापरू नये. पाटील आडनाव वापरून तिने पाटलांची बदनामी केली. गौतमीने पाटील हे आडनाव वापरुनये अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही, असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.
COMMENTS