मुंबई | नगर सहयाद्री पाकिस्तानी अभिनेत्री इकरा अजीज नेहमीच चर्चेत असते. इकरा अजीजचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. ती नेहमी तिचे फोटो ...
मुंबई | नगर सहयाद्री
पाकिस्तानी अभिनेत्री इकरा अजीज नेहमीच चर्चेत असते. इकरा अजीजचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आताही तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. बुधवारी इकराने एक व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. पण इकाराने घातलेला हा ड्रेस वन-साइड ऑफ-शोल्डर असल्यामुळे अनेक पाकिस्तानी नेटकरी संतापले आहेत.
इकरानं शेअर केलेल्या व्हिडीओत ती गुलाबी ड्रेसमध्ये कपड्यांच्या ब्रँडचं प्रमोशन करताना दिसते. या व्हिडीओमध्ये इकरा खेळताना, उड्या मारताना आणि वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. इकरानं हा व्हिडीओ शेअर करत म्हटले, की बुधवारी आम्ही गुलाबी रंगाचे कपडे परिधान करतो, म्हणजे मुली. हा व्हिडिओ समोर येताच नेटकर्यांनी तिला ट्रोल केले. इकरा अजीजनं घातलेला बॅकलेस ड्रेस पाहिल्यानंतर अनेकांनी राग व्यक्त रत तिला संस्कृतीची आठवण करून दिली. ट्विंकल नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्तीनं म्हटले, तुम्ही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये राहताय. एकीनं, आम्ही पण गुलाबी रंगाचे कपडे घालतो पण सोबत शलवारही घालतो.
तू घालायला विसरलीस, असे म्हटले. इर्शाद इबालने लिहिलं, हा ड्रेस घालताना तुला लाज वाटायला पाहिजे. दुसर्यानं लिहिले, सुंदर पारंपारिक कपडे सोडून हे परिधान केल्यास पाकिस्तानची परंपरा नष्ट होईल. इकरा २०२१ मध्ये आलेल्या खुदा और मोहब्बतच्या सीझन ३ मध्ये मुख्य भूमिकेत होती. या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. यात ती पाकिस्तानी अभिनेता फिरोज खानसोबत दिसली.
COMMENTS