मुंबई नगर सहयाद्री - प्रियांका चोप्रा सध्या सिटाडेल आणि लव्ह अगेन या तिच्या वेब सिरीज आणि चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने एका मुलाखती...
मुंबई नगर सहयाद्री -
प्रियांका चोप्रा सध्या सिटाडेल आणि लव्ह अगेन या तिच्या वेब सिरीज आणि चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेली एक वाईट घटना शेअर केली. शिवाय तिने पापाराझींचे आभार मानले, ज्यांनी तिला त्या संकटात मदत केली होती. ती म्हणाली, एकदा ती सर्व माध्यमांसमोर पोज देत होती. रेड कार्पेटची वेळ होती आणि सर्व लोक तिथे उपस्थित होते.
अचानक ती तिच्या ड्रेस व उंच हिल्समुळे अडखळली आणि तिचा तोल गेला, पण पापाराझींनी तिची लाज राखली होती. ती घटना घडताना सगळ्यांनी आपापले कॅमेरे बंद केले आणि तिला मदत करायला सुरुवात केली. आपल्या २३ वर्षांच्या कारकिर्दीत असं कधीच घडलं नसल्याचं ती म्हणाली. रेड कार्पेटवर पोज देताना अचानक ती खाली पडली होती. सगळे कॅमेरे तिच्यावर होते आणि सगळे बघत होते. अशा परिस्थितीत ती खूप अस्वस्थ झाली पण मीडियावाल्यांच्यामुळे ती स्वत:ला सांभाळू शकली. प्रियांका म्हणाली, ’मी आजपर्यंत या घटनेबद्दल कधीच बोलले नाही.
कारण मी दररोज सोशल मीडियावर हे घडताना पाहते. आज मी या ड्रेससोबत खूप मोठ्या हील्स घातल्या आहेत. त्यामुळे मला त्या घटनेची आठवण झाली. प्रियांकाने सांगितले की, ’मी त्यावेळी रेड कार्पेटवर आले होते. खूप गर्दी होती. हॉलिवूड पापाराझींपासून ते चाहते आणि सर्व स्टार्स तिथे उपस्थित होते. तिथे सर्वजण फोटो काढत होते. पण मी रेड कार्पेटवर येताच अचानक गोंधळली आणि खाली पडली. माझ्या २३ वर्षांच्या कारकिर्दीत असं कधीच घडलं नव्हतं.
COMMENTS