अहमदनगर। नगर सहयाद्री - एक आतंरराज्य टोळी एकदम टापटीप पद्धतीने वऱ्हाडी पाहुण्याप्रमाणे लग्न समारंभात येत असे अन भलताच कारभार करत असल्याची घ...
अहमदनगर। नगर सहयाद्री -
एक आतंरराज्य टोळी एकदम टापटीप पद्धतीने वऱ्हाडी पाहुण्याप्रमाणे लग्न समारंभात येत असे अन भलताच कारभार करत असल्याची घटना समोर अली आहे. लग्न समारंभातून रोख रक्कम व मोबाईलची चोरी करणारी आंतरराज्य टोळीला अटक करण्यात येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या टोळीकडून एक लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. प्रदीप कालुसिंग दपानी (वय २४, रा. कडीयासासी, जि. राजगड, मध्य प्रदेश), अमित पन्नासिंग सासी (वय १९, रा. लक्ष्मीपुरा जि. बारहा, राजस्थान) अशी चोरट्यांची नावे आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,काही दिवसापूर्वी मनमाड रोडवरील बंधन लॉन येथे लग्न समारंभात यमुना रघुनाथ लांडगे (वय ७५ रा. लांडगेमळा, ता. नगर) यांच्या दोन लाख १० हजार रूपये किंमतीचा ऐवज असलेली पर्सवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. ही घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डीले, संतोष खैरे, रोहित मिसाळ, रणजीत जाधव, आकाश काळे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, फुरकान शेख, संभाजी कोतकर यांचे पथक समांतर तपास करत होते.
या गुन्ह्यातील चोरटे हे मध्यप्रदेश पासींगच्या दुचाकीवरून पुणे येथून नगर जिल्ह्याकडे येत आहेत, अशी माहिती निरीक्षक आहेर यांना मिळाली होती.निरीक्षक आहेर यांनी पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने सुपा टोल नाका परिसरात सापळा लाऊन दोघांना पकडले. त्यांच्याकडे ८० हजार रूपये रोख रक्कम व दोन मोबाईल फोन मिळून आले. सदरची रक्कम ही नगर शहरातील बंधन लॉन्स येथील लग्न समारंभामध्ये चोरी केल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS