निघोज | नगर सह्याद्री पारनेर, श्रीगोंदा व शिरूर तालुयातील बहुतांश गावांमध्ये असे लोक उपलब्ध आहेत की जे आपली जीभ रुग्णाच्या डोळ्यात फिरवून कच...
निघोज | नगर सह्याद्री
पारनेर, श्रीगोंदा व शिरूर तालुयातील बहुतांश गावांमध्ये असे लोक उपलब्ध आहेत की जे आपली जीभ रुग्णाच्या डोळ्यात फिरवून कचरा काढतात हा प्रकार करणारे बरेचशे जण तंबाखू सह इतर व्यसन करणारे असतात. यामुळे डोळ्याला गंभीर इजा होऊन दृष्टी जाण्याची शयता निर्माण होते. जिभेने डोळ्यातील कचरा काढणे शेकडो लोकांची दृष्टी जाण्यास कारणीभूत ठरत आहे. यामुळे असे प्रयोग रूग्णांनी करू नये आसे आवाहन नेत्र तज्ञ व व्हीजन केअर चे संचालक डॉ.स्वप्निल भालेकर यांनी केले आहे.
डॉ.भालेकर म्हणाले, डोळे हे मानवी शरीराचा महत्त्वाचा घटक आहे. यामुळे त्याची निगा राखने व काही दुखापत झाल्यास नेत्र रूग्णालयात याचा उपचार घेणे आवश्यक आहे. आमच्याकडे येणा-या रूग्णांनमध्ये कचरा जाऊन इजा झालेले रूग्णांसह इतर शस्त्रक्रिया करण्यासाठी येत असतात. यामध्ये कचरा गेलेले रूग्ण गावातील अश्या लोकांकडे जाऊन आलेले असतात की त्याने कुठल्याच प्रकारे या बाबीचे ज्ञान घेतलेले नसते. त्यामुळे जीभेद्वारे हा कचरा काढण्याचा चुकीचा प्रकार हे लोक करतात. यामध्ये व्यसन करणारे लोकही आढळुन येतात.
यामुळे डोळ्याला गंभीर इजा होते. आणि त्यानंतर आमच्याकडे तो रूग्ण येतो. मात्र तोपर्यंत मोठी इजा रूग्णांच्या दृष्टीला झालेली असते. या आठवड़यात एका तालुयातुन वयस्कर आजी रूग्णालयात आल्या होत्या त्या ही गावातील एकाकडे डोळ्यातील कचरा काढण्यासाठी गेले असता पूर्ण डोळ्याला जंतुसंसर्ग झाला. यामुळे त्यांची उतारवयात नजर गेली. अशा प्रकारे शेकडो लोकांचे डोळे पूर्णपणे निकामी झालेले मी गेल्या काही वर्षांत पाहिलेले आहेत. म्हणूनच आपल्याला आवाहन करत आहे की इथून पुढे आपल्या आस पास जरी कोणी अशा प्रकारे कचरा काढून घ्यायला जात असेल तर त्यांना थांबवा कदाचित तुम्ही त्यांचा डोळा आणि दृष्टी वाचवू शकाल.
COMMENTS