५ जुनला सरपंचासह ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा | ठेकेदार नरेंद्र पोळ यांच्यावर कारवाई कर पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रीय पेयजल योजना व आता ...
५ जुनला सरपंचासह ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा | ठेकेदार नरेंद्र पोळ यांच्यावर कारवाई कर
पारनेर | नगर सह्याद्री
राष्ट्रीय पेयजल योजना व आता जलजीवन मिशन योजनेचे काम शासकीय ठेकेदार नरेंद्र पोळ यांच्या नृसिंह एजन्सीला देण्यात आले असून हे काम निकृष्ट व दिरंगाईने होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने केलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाची खातेनिहाय चौकशी करून संबंधित एजन्सीवर कारवाई करावी. सध्या उन्हाळ्यात पाणी उपलब्ध असतानाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने गावकर्यांना न्याय न दिल्यास पारनेर पंचायत समिती समोर ५ जुन रोजी आत्मदहन करण्याचा इशारा सरपंच संतोष मोरे व ग्रामस्थांनी दिला आहे. तर दुसरीकडे सलग दुसरे योजनेचेही काम निकृष्ट करणार्या शासकीय ठेकेदार नरेंद्र पोळला काळ्या यादीत टाकावे अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
पारनेर तालुयातील वारणवाडी-कामटवाडी गावात गेल्या अनेक दिवसापासून पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतवर पिण्यासाठी हक्काचं पाणी मिळावं यासाठी महिलांनी हंडा मोर्चा काढत थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठल्याने वारणवाडी ग्रामपंचायतचा पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गावात राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे करुनही त्याच एजन्सीला जलजीवन मिशन योजनेचे काम दिले आहे. संबंधित काम करत असताना प्रथमतः पाण्याचा उद्भवाच्या म्हणजेच विहीरीच्या खोदकापासुन कामाची सुरुवात होणं अपेक्षित असताना संबंधित ठेकेदार मात्र मनमानी पद्धतीने काम करत दोन्ही योजनेचा निधी गिळंकृत करुन निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी या पाणी योजनेचे काम कासव गतीने चालू असून ग्रामस्थांचे मात्र पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत.
सचिन कोकाटे यांनी २४ मे २०२३ रोजी ग्रामस्थांच्या वतीने सरपंचांना दिलेल्या पत्रानुसार ग्रामपंचायत सदस्या रोशनी सुनिल काशिद यांच्यासह वारणवाडी गावच्या महिलांनी रिकामे हांडे डोयावर घेऊन गावातून हक्काचं पाणी मिळालच पाहिजे अशा घोषणा देत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला असता कार्यालयात उपस्थित असलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता.
सरपंच संतोष मोरे यांनी संबंधित मोर्चामध्ये सामील होत आक्रमक झालेल्या महिलांना शांत करत आमदार नीलेश लंके यांसह अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पारनेरचे तहसीलदार, पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पारनेरचे उप अभियंता व पारनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन दिले असून त्यात संबंधित नृसिंह कन्स्ट्रशन द्वारा सुरु असलेले जलजीवन मिशन योजनेचे काम ठेेकेदार नरेश पोळ करत आहे. यापुर्वीही सन २०२१ साली राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम त्यांनीच केलेले आहे. तर तेही काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले आहे.
गेल्या महिनाभरापासून वारणवाडी गावात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत पालकमंत्री जिल्हा परिषद पारनेर पंचायत समितीकडे ग्रामपंचायत मार्फत अधिकार्यांना वारंवार तोंडी व लेखी तक्रारी केल्या जात आहेत. स्थानिक ग्रामस्थ सरपंच, उपसरपंच सह ग्रामपंचायत पदाधिकार्यांना योजनेबाबत धारेवर धरत चुकीच्या कामाबाबत शंका कुशंका उपस्थित करत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी संबंधित अधिकार्यांवर देखील कार्यवाही करावी अशी मागणीही नागरीकांकडून होत आहे.
COMMENTS