मुंबई। नगर सहयाद्री - आज १६ सदस्यांची सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प...
मुंबई। नगर सहयाद्री -
आज १६ सदस्यांची सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव आजच्या निवड समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. सूत्राच्या माहिती नुसार शरद पवारच अध्यक्ष राहणारआहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतला मोठा निर्णय झाला आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयात सुरू झाली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला होता. राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.थोड्याच वेळात अजित पवार हे पत्रकार परिषद घेऊन बैठकीबाबतची माहिती देणार आहेत.
COMMENTS