अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मानवी तस्करीचे रॅकेटचा पर्दाफाश करत चौघांना ताब्यात घेतले आहे. अहमदनगर । नगर सहयाद्री - अहमदनगर जिल्...
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मानवी तस्करीचे रॅकेटचा पर्दाफाश करत चौघांना ताब्यात घेतले आहे.
अहमदनगर । नगर सहयाद्री -
अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यात मानवी तस्करी करून युवकांना मारहाण करत डांबून ठेवून, आपली कामे करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतलं असून ४ जनाची करण्यात आली आहे.या प्रकारामुळे श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, बेलवंडी शिवारात अशा प्रकारचे मानवी तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, शेंडगे वस्ती व बोडके मळा या ठिकाणी छापा टाकला असता वेठबिगारी म्हणून कामात असलेला करण कुमार (छत्तीसगड) ललन सुखदेव सोपाल(बिहार) येथील मजुराची सुटका करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पिलाजी भोसले, अमोल भोसले , अशोक भोसले , गंज्या काळे या आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. मानवी तस्करी करत बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणून त्यांच्याकडून घरची आणि शेतातील काम करून घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तर काही ठिकाणी रेल्वे स्थानकांवर अशा लोकांकडून भीक मागून घेतली जात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
COMMENTS