शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद | चोंभूत येथे नीलक्रांती तरुण मित्र मंडळ आयोजित संयुक्त जयंती महोत्सव निघोज | नगर सह्याद्री कायदेपंडित ड...
शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद | चोंभूत येथे नीलक्रांती तरुण मित्र मंडळ आयोजित संयुक्त जयंती महोत्सव
निघोज | नगर सह्याद्री
कायदेपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास अतिशय हलाखीच्या परिस्थितीतुन झाला असून त्यांच्या संघर्षात त्यांचे वडील रामजी आंबेडकर व पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा मोलाचा वाटा होता. म्हणून ते पुढे विद्वान होवू शकले. तसेच उपस्थित तरुनांना एकच संदेश यनिमित्ताने सांगावसा वाटतो की आपण या महामानवाप्रमाणे शिकून इतकं उंच व्हावं की जगाने आपल्याकडे उंच टाचा करून पाहिलं पाहिजे. तसेच महामानव हे डोयावर घेण्याऐवजी डोयात घेण्याची नितांत गरज आहे असे मत शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांनी व्यक्त केले आहे.
पारनेर तालुयातील चोंभूत येथील गौतमनगर मधील नीलक्रांती तरुण मित्र मंडळ आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पि. जे. अब्दुल कलाम या महामानवाच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले होते.तेव्हा कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
जयंती महोत्सव मिरवणुकीत बुद्ध रथाची निर्मिती
यंदाच्या जयंती महोत्सवाचे १८ वे वर्ष होते. जयंतीचे मुख्य आकर्षण भव्य मिरवणूक असते यंदाही नीलक्रांती तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन अर्जुन भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची बोधीवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेली प्रतिकृती मुख्य आकर्षण होते. रथ सजावटीस मंडळाचे सदस्य यांचे योगदान लाभले.
यावेळी. आ. निलेश लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके गुरुजी यांनी सदर कार्यक्रम प्रामाणिक पणे एकनिष्ठेने राबवला एक दिवाळीसदृश व शहरी भागाला लाजवेल असा कार्यक्रम झाला असे जयंती महोत्सव बद्दल कौतुक केले. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष मछिंद्र माळी यांनी गेली १८ वर्षांपासून चालवत असलेला जयंती महोत्सव हलाखीच्या परिस्थितीतुन चालू ठेवला पुढे चांगल कार्य घडत जावो अश्या सदिच्छा दिल्या तसेच मुंबई पोलीस मध्ये निवड झालेल्या पूजा राजू भालेराव हिचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण म्हस्के गावच्या लोकनियुक्त सरपंच कांचनताई म्हस्के उपसरपंच निर्मलाताई मेहेर, उपसरपंच दत्तात्रय म्हस्के, पत्रकार स्वप्नील भालेराव, युवा नेते संतोष खाडे, उद्योजक मच्छिंद्र माळी, पोलीस पाटील रामदास भालेराव, सोसायटी संचालक किसन गुंजाळ, बंडु भालेराव, राजू भालेराव, युवा नेते सचिन भालेराव, संतोष भालेराव, प्रा.मुरलीधर खुपटे, उपाध्यक्ष गणेश रामदास भालेराव, दिपक भालेराव, डॉ. प्रवीण भालेराव, संजय भालेराव, रेनवडी सरपंच श्रीकांत डेरे, शिरापूर चे माजी उपसरपंच संतोष शिनारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप भालेराव यांनी केले तर आभार गणेश भालेराव यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता स्वरांजली निर्मिती ’गौरव माझ्या महाराष्ट्राचा’ या मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमास पारनेर पोलीस कर्मचारी हेडकॉन्स्टेबल मोढवे व झावरे यांचाही बंदोबस्त होता.
COMMENTS