खरेदी विक्री संघाची निवडणूक | आमदार लंके यांनी घेतली महाविकास आघाडीची बैठक पारनेर | नगर सह्याद्री पारनेर खरेदी विक्री संघाची निवडणुकीतील मा...
खरेदी विक्री संघाची निवडणूक | आमदार लंके यांनी घेतली महाविकास आघाडीची बैठक
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर खरेदी विक्री संघाची निवडणुकीतील माघार घेण्यासाठी गुरुवारची अंतिम मुदत असल्याने या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात भाजप - शिंदे गट अशी लढत पुन्हा एकदा पहावयास मिळणार आहे. या निवडणुकीत एक जागा जवळपास बिनविरोध झाली आहे.
४ विरूध्द १ जिंकू
अनावधानाने एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला असला तरी त्याचा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही. आमच्याकडे असंख्य उमेदवार होते. उमेदवारी द्यायची कोणाला हा प्रश्न होता. त्यामुळे उमेदवार मिळाला नाही म्हणून पॅनल लंगडा झाला असे म्हणता येणार नाही. आम्ही आमच्या सर्व १४ जागा मोठया फरकाने जिंकून पुन्हा बाजार समितीच्या निकालप्रमाणेच आनंदोत्सव साजरा करणार आहोत.
-बाबाजी तरटे, अध्यक्ष, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस.
तर या खरेदी विक्री संघासाठी एकूण ३९० मतदार यामध्ये प्रामुख्याने २७४ वैयक्तिक तर ११६ सेवा संस्था मतदारसंघातील मतदार असल्याने या खरेदी विक्री संघाच्या १४ जागेसाठी ४ जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनल विरुद्ध भाजप शिंदे गटाच्या जनसेवा पॅनल मध्ये सरळ सरळ लढत होणार आहे. निवडणूकीत महाविकास आघाडीस छत्री तर भाजपा-शिवसेना शिंदे गटाला कपबशी हे चिन्ह मिळाले आहे.
शेतकरी सहकार पॅनल
सोसायटी सहकारी संस्था मतदारसंघ- संभाजी देवराम रोहोकले, सुभाष रघुनाथ दिवटे, संतोष विठ्ठल जासुद, चंदू माधव मोढवे, दत्तात्रय जयसिंग लंके, हरिभाऊ शंकर चौधरी, बाळासाहेब परसराम बेलोटे, व्यक्तिगत मतदार संघ : बबन पोपट झावरे, गणेश विक्रम शेळके अनु. जाती प्रतिनिधी : चंद्रकांत भिकाजी सोनवणे, महिला प्रतिनिधी : नर्मदा अशोक नाईकवाडी, मनिषा अच्युत जगदाळे इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : संदीप अंबादास भागवत, भटया
विमुक्त जाती मतदारसंघ : अजित नामदेव सांगळे
खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडी प्रणीत सहकार पॅनलच्या प्रचारामध्ये नीलेश लंके प्रतिष्ठाणची यंत्रणा सक्रिय झाली आहे. गुरूवारी सकाळी आ. नीलेश लंके यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात प्रतिष्ठाणचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली. ज्या पध्दतीने बाजार समितीची निवडणूक लढविली त्याच पध्दतीने या निवडणूकीस सामोरे जायचे असल्याचे यावेळी आ. नीलेश लंके यांनी सांगितले.
बाजार समितीप्रमाणे एक दिलाने निवडणूक लढू आणि जिंकूही..
बाजार समितीची निवडणूक मोठया फरकाने जिंकली. खरेदी विक्री संघ ही संस्था बंद असल्यासारखी आहे. आपल्याला संस्था उर्जीत अवस्थेत आणायची आहे. त्यासाठी निवडून येणार्या संचालकांनी संस्थेसाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा. बाजार समितीच्या निवडणूकीत मतदारांनी सोसायटी मतदारसंघात भरभरून मतदान दिले आहे. त्याच सोसायटयांचे या निवडणूकीत मतदार आहेत. बाजार समितीला ज्या पध्दतीने काम केले. त्याच पध्दतीने या निवडणूकीत आपण काम करणार आहोत. ही निवडणूकही जिंकणे अशय काहीच नाही. आपण निवडणूक ताकदीने लढवू व जिंकून दाखवू.
-रामदास भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ठाकरे गट.
बैठकीत आ. लंके यांनी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांची प्रतिष्ठाणच्या पदाधिकार्यांना ओळख करून दिली. आ. लंके म्हणाले, बाजार समितीच्या निवडणूकीप्रमाणेच या निवडणूकीचेही गणित आहे. या निवडणूकीत आपलाच विजय असला तरी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडावी.
जनसेवा सहकार पॅनल
सोसायटी व सहकारी संस्था मतदारसंघ : प्रसाद भरत शितोळे, सुनील बाळू पवार, दत्तात्रय जयराम रोकडे, बाजीराव रामचंद्र अलभर, संग्राम बाळासाहेब पावडे, गंगाधर भानुदास रोहोकले, सतिश राजाराम पिंपरकर, प्रमोद बबनराव कावरे. व्यक्तिगत मतदारसंघ : रघुनाथ माधवराव खिलारी, शैलेंद्र संपतराव औटी, अनु. जाती प्रतिनिधी : मधुकर हरीभाऊ पठारे, महिला राखीव प्रतिनिधी : रेखा संजय मते, ज्योती संदीप ठुबे, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : अण्णा बबन शिंदे, भटया विमुक्त जाती मतदारसंघ : भाऊसाहेब महादू मेचे
COMMENTS