सहकार मित्र परिवारातर्फे कृष्णा मसुरे, सीए अमित फिरोदिया यांचा सत्कार अहमदनगर | नगर सह्याद्री हकारातील युवा रत्नांच्या सत्कार समारंभास अध्य...
सहकार मित्र परिवारातर्फे कृष्णा मसुरे, सीए अमित फिरोदिया यांचा सत्कार
अहमदनगर | नगर सह्याद्री
हकारातील युवा रत्नांच्या सत्कार समारंभास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहताना खूप आनंद झाला आहे. नगर जिल्ह्याने, महाराष्ट्राला संपूर्ण देशाला सहकार चळवळीतून समृध्दी कशी साधता येते हे दाखवून दिले आहे. स्व.पद्मश्री विखे पाटील यांच्या पुढाकारातून प्रवरानगरला पहिला सहकारी साखर कारखाना सुरु झाला. आज नगर जिल्ह्यात अनेक सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका, पतसंस्था कार्यरत आहेत. कर्तृत्ववान माणसांमुळे सहकाराचा कायम विस्तार झाला आहे, असे प्रतिपादन फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को ऑप.क्रेडीट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी केले.
सहकार मित्र परिवारातर्फे व्यंकटेश मल्टीस्टेटचे नूतन चेअरमन कृष्णा मसुरे व नागेबाबा उद्योग समूहाचे सी.ए.अमित फिरोदिया यांचा सहकार क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल सुरेश वाबळे यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, व्यंकटेश ग्रुपचे संस्थापक चेअरमन अभिनाथ शिंदे, सी.ए. किरण भंडारी, व्यंकटेश मल्टीस्टेटचे सह संस्थापक व्यंकट देशमुख, अनिल गुंजाळ, डिझाईन डिटचे ज्ञानेश शिंदे आदींसह सहकारातील विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे सदस्य आर्टिस्ट ज्ञानेश शिंदे यांनी सहकारातील युवा रत्नांच्या सन्मानातून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले. व्यंकटेश ग्रुपचे संस्थापक चेअरमन अभिनाथ शिंदे म्हणाले की, नगर जिल्हा हा सहकाराची पंढरी आहे. सहकाराचा मोठा वारसा जिल्ह्याला लाभलेला आहे. हा वारसा पुढे नेण्याचे काम युवा वर्गाचे आहे. कृष्णा मसुरे, अमित फिरोदिया हे युवा सहकारात ठसा उमटविणारे योगदान देत सहकाराचा वारसा पुढे नेण्याचे काम करीत आहेत. सहकारातील हे युवा रत्न खर्या अर्थाने इतरांना प्रेरणा देणारे आहेत.
शिवाजीराव कपाले म्हणाले की, कृष्णा मसुरे, अमित फिरोदिया यांच्यासारखे तरूण सहकारात उत्कृष्ट योगदान देत आहेत हे पाहून आनंद होतो. अतिशय कमी वयात त्यांनी सहकारात मोठे काम करून दाखवले. नागेबाबा मल्टीस्टेट, व्यंकटेश मल्टीस्टेट या संस्था सहकारातील खरा आदर्श आहेत. सी.ए.किरण भंडारी म्हणाले की, सुरेश वाबळे, कडूभाऊ काळे यांनी सहकार फक्त रूजवलाच नाही तर त्याचे वटवृक्षात रूपांतर केले आहे. त्यांचा अनुभव, नवनवीन संकल्पना खूप अभिनव असतात. कितीही संकटे आली तरी त्यावर हसतखेळत मात कशी करावी हे कडूभाऊ काळेंकडून शिकायला मिळतात. त्यांचा अनुभव व मार्गदर्शन दोन्ही सहकार युवा रत्नांसाठी मोलाचे ठरणार आहे.
सहकारात अनेक नवनवीन नियम येत असतात. कायद्याने आणि नियमानुसार काम करणार्या संस्थाच नावारूपाला येवून विश्वासार्हता मिळवतात. कृष्णा मसुरे म्हणाले की, आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका खूप महत्वाची असते. योग्य मार्गदर्शक नसल्याने अनेक संस्था बंद पडतात. सुदैवाने आम्हाला अतिशय चांगले मार्गदर्शक मिळाले व आम्हाला सहकारात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. सुरेश वाबळे, कडूभाऊ काळे यांच्याकडील अनुभवाचा खजिना कायम ते देत असतात. त्यांच्यामुळेच व्यंकटेश मल्टीस्टेट एका उंचीवर पोहचली आहे. मी २०११ मध्ये लार्क म्हणून व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये रूजू झालो.
आज अभिनाथ शिंदे यांनी संस्थेचे चेअरमनपद माझ्याकडे सोपविले आहे. यातून अनेक नवनवीन जबाबदारींची जाणीव झाली. एक मोठे आव्हान आपल्यासमोर आहे हे कळले. या आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे नक्कीच मिळेल, असा विश्वास मसुरे यांनी व्यक्त केला. अमित फिरोदिया म्हणाले की, माझ्या वाटचालीत माझे गुरू सी.ए.किरण भंडारी यांचा मोठा वाटा आहे.
सहकारात काम करताना अनेक नवीन अनुभव मिळाले. नागेबाबा मल्टीस्टेटमध्ये काम करताना कडूभाऊ काळे यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. सहकारातील युवा रत्न या सत्कार समारंभास नगर जिल्ह्यातील विविध मान्यवर व मित्रपरिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल बागूल यांनी केले.
COMMENTS