सुनील चोभे / |नगर सहयाद्री माजी खासदार कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब बोठे तर उपसभापत...
सुनील चोभे / |नगर सहयाद्री
माजी खासदार कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब बोठे तर उपसभापतिपदी रभाजी सूळ यांची बिनविरोध निवड झाली. सभापती व उपसभापतिपदाच्या दोन्ही जागांसाठी एकमेव अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक देविदास घोडेचार यांनी काम पाहिले.
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजप नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाने सर्व १८ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. या निवडणुकीत नगर तालुका महाविकास आघाडीचे चौथ्यांदा पानिपत झाले. सोमवार दि. २२ रोजी नूूतन संचालकांची विशेष झाली. या सभेत सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली. सभापतीपदासा व उपसभापतिपदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.
सभापती व उपसभापतिपदाचे नाव भाजप नेते शिवाजी कर्डिले, माजी सभापती भानुदास कोतकर, माजी आमदार अरुण जगताप यांच्याकडून निश्चित करण्यात आले. सभापतिपदासाठी भाऊसाहेब बोठे, सुधीर भापकर, संतोष म्हस्के यांची नावे चर्चेत होती, तर उपसभापतिपदासाठी मधुकर मगर व रभाजी सूळ यांची नावे चर्चेत होती. सर्व नूतन संचालकांची सोमवारी सकाळी बुर्हाणनगर येथे बैठक झाली.
बैठकीनंतर कर्डिले-कोतकर यांनी सभापती, उपसभापतींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर बंद पाकिटात सभापती व उपसभापतींची नावे देण्यात आली. सभापती भाऊसाहेब बोठे यांच्या अर्जावर सूचक म्हणून हरिभाऊ कर्डीले, अनुमोदक म्हणून संतोष म्हस्के होते. उपसभापती रभाजी सूळ यांच्या अर्जावर अनुमोदक म्हणून भाऊसाहेब ठोंबे होते. या दोघांनीच सभापती-उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले. निवडीनंतर त्यांचा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व नूतन संचालक, पदाधिकांर्यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
COMMENTS