सांगली। नगर सहयाद्री - सांगली जिल्ह्यामधून मांत्रिकाचा भयंकर प्रताप उघडकीस आला आहे. भूतबाधा काढण्यासाठी केलेल्या मांत्रिकाने केलेल्या प्रयो...
सांगली। नगर सहयाद्री -
सांगली जिल्ह्यामधून मांत्रिकाचा भयंकर प्रताप उघडकीस आला आहे. भूतबाधा काढण्यासाठी केलेल्या मांत्रिकाने केलेल्या प्रयोगात शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंनिसच्या पाठपुराव्यानंतर मंगळवारी रात्री मांत्रिकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आर्यन दिपक लांडगे (वय १४) असे मृत शाळकरी मुलाच नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,सांगली जिल्ह्यामधील इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे सदर घटना घडली आहे. आर्यन दिपक लांडगे (वय १४) याला ताप येत होता. तो आजराने त्रस्त असताना एका नातेवाईक महिलेने आर्यनला एका मांत्रिकाकडे नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आर्यनला कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर या गावातील आप्पासाहेब कांबळे या मांत्रिकाकडे उपचारासाठी आणण्यात आले होते.
मांत्रिकाने सांगितले की, मुलाला बाहेरची बाधा झाली आहे, त्यांच्या अंगात भूत शिरलं आहे, ते बाहेर निघत नाही. म्हणून त्या मुलाची भूतबाधा बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाने त्या मुलाला अमानुषपणे मारहाण केली. यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्या मुलाचा शनिवारी मृत्यू झाला.
COMMENTS