माहिती सेवा समितीच्या पाठपुराव्याला यश; आमदार लंके यांच्या हस्ते उद्घाटन सुपा | नगर सह्याद्री मंडळ अधिकारी कार्यालय हे वाड...
मंडळ अधिकारी कार्यालय हे वाडेगव्हाण येथे असल्यामुळे शेतकर्यांना त्या ठिकाणी जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेत हे कार्यालय पळवे खुर्द येथे व्हावे यासाठी अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या वतीने आंदोलने करून त्याचा पाठपुरावा करत प्रामुख्याने माहिती सेवा समितीचे पदाधिकारी यांच्यावतीने तहसील कार्यालयामध्ये भजन व टाळे ठोक आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी प्रसाद लंके, तालुकाध्यक्ष शरद रसाळ, सचिव सुदाम दरेकर, डॉ.गुलाब शेख, रामदास शिंदे, राजेंद्र रसाळ, संतोष रांजणे यांच्यासह माहिती सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी या कार्यालयाला मंजुरी मिळाली होती. परंतु जागे अभावी ह्या कार्यासाठी विलंब झाला. परंतु आता यासाठी पळवे खुर्द येथे जागा उपलब्ध झाली असून हे कार्यालय पळवे खुर्द येथे आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते उद्घाटन करून ते सुरूही झाले आहे. यामुळे आता वाडेगव्हाण येथे ये- जा करण्याचा शेतकर्यांचा ताण वाचणार आहे. शेतकर्यांनी माहिती सेवा समितीचे आभार मानले आहेत.
या कार्यालयामध्ये जवळपास १४ गावांचा संपर्क जोडला गेला आहे. आता आपल्या शेती संदर्भात कामासाठी वाडेगव्हाणला जाण्याची गरज नाही असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी तालुका युवक तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, बँक संचालक संजय तरटे, काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष वाळवणे सचिन पठारे, मुंगशी गावचे सरपंच अनिल करपे, माजी सरपंच रामदास तरटे, माजी सरपंच नानाभाऊ गाडीलकर, माजी. उपसरपंच संजय नवले, उपसरपंच अमोल जाधव, माजी उपसरपंच तात्या देशमुख, माजी चेअरमन रोहिदास नवले, तात्या भाऊ शेळके, पोपटराव तरटे, उद्योजक रवींद्र नवले, हरिभाऊ भंडलकर, पोलीस पाटील संभाजी पाचारणे, दत्ता गाडीलकर, डोमे भाऊसाहेब, नियुक्त सर्कल एस.एस.जेठे, तलाठी प्रकाश शिरसाट, प्रसाद तरटे, अमोल शेळके, अंबादास तरटे, अमोल तरटे, तसेच पळवे खुर्द व पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
COMMENTS