मुंबई। नगर सहयाद्री - देशाच्या बहुतांश भागामध्ये सूर्यानं आग ओकण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळक आहे...
मुंबई। नगर सहयाद्री -
देशाच्या बहुतांश भागामध्ये सूर्यानं आग ओकण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळक आहे. या धर्तीवर हवामान विभागानंही राज्यातील तापमानाबाबत महत्त्वाचा इशारा देत नागरिकांना सतर्क केलं आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच पुढील दोन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
देशातील अनेक राज्यात तापमान ४५ अंशावर गेले आहे. आज देशातील अनेक राज्यात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत कमाल तापमान ४२अंश सेल्सिअल आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअर राहण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये देखील तापमान २ते ३अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. तसेच जोधपूर, बिकानेरमध्ये तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये तापमान ४२ अंशापार जाण्याची शक्यता आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आण त्रिपुरामधील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून यात आणखी भर पडल्यास उष्माघाताशी संबंधित आरोग्य तक्रारी वाढू शकतील, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे, सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत घराबाहेर पडू नये असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. फिरतीचं काम असणाऱ्यांनी सतत पाणी पिणं आवश्यक आहे. तसंच लिंबूपाणी, फळांचे ज्यूस पिणंही गरजेचं आहे. कारण उकाडा जाणवल्यावर आपलं शरीर हे पाणी आणि क्षार बाहेर फेकून स्वतःला थंड ठेवत असतं. मात्र पाणी वेळेत प्यायलं नाही तर हीट स्ट्रोकचा धोका असतो.
COMMENTS