चार सभापतींची ११ मे रोजी निवड पारनेर | नगर सह्याद्री पारनेर नगरपंचायतींतर्गत येणार्या चार विषय समिती सभापतीचा कार्यकाळ संपला असून नव्या स...
चार सभापतींची ११ मे रोजी निवड
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर नगरपंचायतींतर्गत येणार्या चार विषय समिती सभापतीचा कार्यकाळ संपला असून नव्या सभापतींची ११ मे रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत निवड होणार आहे. आ. नीलेश लंके, माजी आ. विजय औटी यांच्या एकत्रित येण्यामुळे आता सुरूवातीला विरोधक असलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांनाही सभापतिपदाची संधी मिळण्याची शयता आहे.
चार विषय समित्यांमध्ये बांधकाम समिती, महिला बालकल्याण समिती, आरोग्य व स्वच्छता समिती व पाणीपुरवठा समितीचा समावेश आहे. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी ठाकरे गटाच्या जायदा राजू शेख यांची वर्णी लागण्याची शयता आहे. बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गट अशी महाविकास आघाडी एकत्रित लढली. नगरपंचायतीमध्ये सुद्धा आता हे एकत्र येत आहेत.
नगराध्यक्षपदी डॉ. कावरे, अडसूळ; उपनगराध्यक्षपदासाठी मते, शिंदे शेलार
पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी सव्वा वर्षाचा कार्यकाळ राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके यांनी जाहीर केला आहे. २० मे रोजी या कार्यकाळाची मुदत संपत आहे. नगराध्यक्षपदी डॉ. विद्या बाळासाहेब कावरे व उद्योजक नितीन अडसूळ यांची नावे चर्चेत आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीच्या वतीने योगेश मते, सुभाष शिंदे, भूषण शेलार यांची नावे चर्चेत आहेत.
स्विकृत नगरसेवक श्रीकांत चौरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. सादिक राजे यांच्या नावावर आमदार लंके यांनी शिक्कामोर्तब केले आहे. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बदलाचे वारेही लवकरच वाहू लागतील. त्यामुळे या पदांवर नवीन चेहर्यांना संधी मिळणार का, याकडे लक्ष आहे.
पारनेरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, शहर विकास आघाडीचे तीन, भाजपचा एक नगरसेवक व विरोधी बाकावर शिवसेनेचे सहा नगरसेवक असे बलाबल आहे. पारनेर तालुयात महाविकास आघाडी अस्तित्वात येताच ठाकरे गटाचे नगरसेवक पैलवान युवराज पठारे, विद्या गांधाडे यांनी बंडाचा झेंडा हाती घेत भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटाचे तीन कांतीलाल ठाणगे, जायदा राजू शेख व नवनाथ सोबले यांनी माजी आमदार विजय औटी यांच्याबरोबर राहणे पसंत केले. त्यामुळे विषय समिती सभापतिपदी तिघांपैकी एकाला दरवर्षी संधी मिळण्याची शयता आहे.
COMMENTS