अहमदनगर | नगर सह्याद्री कोरोना संकट काळानंतर आरोग्य सुविधेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आता नागरिक विविध आजारपणाला सामोरे जात आहे. त्यात...
अहमदनगर | नगर सह्याद्री
कोरोना संकट काळानंतर आरोग्य सुविधेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आता नागरिक विविध आजारपणाला सामोरे जात आहे. त्यातच आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण आपल्या आजारपणाकडे दुर्लक्ष करीत आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य प्रत्येकाने पार पाडले पाहिजे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सैंदाणे लिनिक यांनी मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम केले आहे. कोरोना संकट काळातील डॉ. सैंदाणे यांचे आरोग्य सेवेतील कार्य कौतुकास्पद आहे. मंगल गेट परिसरातील नागरिकांचा आरोग्य सेवेचा विश्वास संपादन केला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त मंगल गेट येथील सैंदाणे लिनिक आयुर्वेद व पंचकर्म सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. संजय पुंड, डॉ. सुज्योत सैंदाणे, डॉ. सतीश राजूरकर, डॉ.अक्षय फिरोदिया, डॉ. अपूर्व फिरोदिया, डॉ. शरद ठुबे, डॉ. साहिल कुलकर्णी, डॉ. अशपाक पटेल, डॉ. गौरव इंगळे, डॉ.जेटी शेंडगे, डॉ. गौरव इंगळे, डॉ. देवयानी बारगळ, नगरसेवक सुनील त्रिंबके, सागर मुर्तडकर, शांताराम राऊत, डॉ.स्नेहल सैंदाणे, आदी उपस्थित होते
डॉ. सुज्योत सैंदाणे म्हणाले की, मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना खर्या अर्थाने आरोग्य सुविधा उपलब्ध होत असतात. आरोग्य शिबिरे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी सैंदाणे लिनिक वर्षभर विविध मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करत असतात. यावेळी मोफत रक्ताच्या तपासण्या, मोफत बीपी, ईसीजी द्वारे हृदय तपासणी, मोफत औषधे, मोफत नेत्र तपासणी, कम्पिंग थेरेपी, मोफत फिजिओथेरपी, मोफत दंत तपासणी, हिंजामा सोनोग्राफी सवलतीच्या दरात ऑपरेशन व लेब्रोस्कॉपी सवलतीच्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिले आहे. विविध तज्ञ डॉटरांमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली यावेळी मंगल गेट परिसरातील मोठ्या संख्येने मोफत शिबिराचा लाभ घेतला आहे असे ते म्हणाले.
COMMENTS