अहमदनगर । नगर सहयाद्री - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगात प्रतिमा उंचावत चालली आहे, त्यामुळे विरोधकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटत आहे....
अहमदनगर । नगर सहयाद्री -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगात प्रतिमा उंचावत चालली आहे, त्यामुळे विरोधकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटत आहे. त्यांना आपले स्वतःची दुकानदारी बंद होण्याची भीती वाटत आहे म्हणून ते एकवट आहे. अहमदनगर मध्ये बोलतांना ते म्हणाले, अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांविषयी काय बोलतात आणि अरविंद केजरीवाल यांच्याविषयी उद्धव ठाकरे काय बोलतात हे जरा तपासा. त्यामुळे बाहेरुन कीर्तन आणि आतून तमाशा विरोधकांचा चालला आहे. अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.
विखे पाटील म्हणाले , जगामध्ये भारत हा समृद्ध आणि बलवान देश म्हणून पुढे येत आहे. त्यातच नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे जगाने स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते संसदेचे उद्घाटन होत असताना विरोधकांना पोटशूळ का उठला आहे? एक आदिवासी महिलेने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दाखल केली होता त्यावेळी विरोधकांनी त्यांना सहकार्य का केलं नाही असाही सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला होता.
पुढे बोलताना म्हणाले, जागावाटपावरुन शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाही. जरी एखाद्या पक्षाचा नेता जागा वाटपाबाबत बोलत असेल ते त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला कुठलं स्थान आहे, काँग्रेस मूठभर राहिली आहे अशी टीका राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसवर केली आहे.
COMMENTS