पाच जणांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अहमदनगर | नगर सह्याद्री अहमदनगर शहर व उपनगरात अवैधरित्या विक्री होणारी ई सिगारेट व हुक्का पार्लरव...
पाच जणांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर शहर व उपनगरात अवैधरित्या विक्री होणारी ई सिगारेट व हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून पाच जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ४२ हजार ६१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
चेतन बाबासाहेब खर्डे (वय ३१, रा. प्रोफेसर चौक, सावेडी), प्रशांत गजानन सोनवणे (वय ३२, रा. केडगाव), जुबेर फिरोज सय्यद (वय १९, रा. बोल्हेगांव), तेजस मिलिंद भिंगारदिवे (वय २०, रा. आर्यन कॉलनी, बोल्हेगाव), कृष्णा अशोक इंगळे (रा. सर्जेपुरा) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४२ हजार ६१० रुपये किंमतीचा ग्रेप्स, अरेबियन, स्ट्रॉबेरी आईस, लश आईस, पॅशन फ्रुट, हुक्का फ्लेवर व इलेट्रीक सिगारेट काचेचे व स्टीलचे पॉट, रबरी पाईप, विविध प्रकारचे फ्लेवर, प्लॅस्टीक फिल्टर, मातीची चिलम आदी साहित्य जप्त केले आहे.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी शाखेतील पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना रविंद्र कर्डीले, विशाल गवांदे, सचिन आडबल, पोकॉ रणजीत जाधव व मपोकॉ सारीका दरेकर यांचे पथक नेमून अहमदनगर शहरामध्ये अवैध हुक्का पार्लरविरुध्द कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार प्रोफेसर चौक ते प्रेमदान चौक रस्त्यावर पान फंडा नावाच्या दुकानात चेतन खर्डे सार्वजनिकरित्या मानवी जिवीतास धोका निर्माण होईल असा तंबाखूजन्य पदार्थ स्वत:कडे बाळगुन ई सिगारेट हुयांची तंबाखु व फ्लेवर याची चोरुन विक्री करीत आहे. तसेच सर्जेपुरा येथील इंगळे आर्केडच्या तळघरामध्ये कृष्णा इंगळे बंदी असलेला हुक्कापार्लर चालवित आहे. त्यानुसार त्यांनी पथकाला सांगून संबंधित ठिकाणी छापे टाकले. मुद्देमाल जप्त केला असून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS