मुंबई। नगर सहयाद्री बार्ड ऑफ ब्लड, पोन्नियन सेल्वन -१ आणि पोन्नियन सेल्वन- २ फेम शोभिता धुलिपाला साऊथ इंडस्ट्रितील सुपरस्टार नागा चैतन्यसोब...
मुंबई। नगर सहयाद्री
बार्ड ऑफ ब्लड, पोन्नियन सेल्वन -१ आणि पोन्नियन सेल्वन- २ फेम शोभिता धुलिपाला साऊथ इंडस्ट्रितील सुपरस्टार नागा चैतन्यसोबत असलेल्या रिलेशनमुळे चर्चेत आली आहे. दोघांमध्येही कोणत्याच प्रकारचे नाते नसून सध्या सोशल मीडियावर त्यांच्यातील नात्याची चर्चा रंगली आहे. समंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य सध्या अभिनेत्री शोभिताला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. अलीकडेच शोभिताने सोशल मीडियावरील या चर्चांवर मौन सोडले आहे. काही मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांचे एकमेकांना डेट करत असल्याचे फोटो बरेच व्हायरल होत आहे.
नुकतंच एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतींमध्ये शोभिता आणि नागा चैतन्याने रिलेशनच्या चर्चांवर मौन बाळगले. फिल्मबीटच्या एका रिपोर्टनुसार, शोभिताला त्यांच्यातील रिलेशनबद्दल विचारले, तेव्हा ती म्हणते, जे लोक कोणताही पुरावा नसताना आरोप करतात, त्यांना मी उत्तर देणे महत्वाचे समजत नाही. जेव्हा मी कुठलेही चुकीचे काम करत नाही तेव्हा रते माझं काम नाही. मला कोणत्याही गोष्टीला स्पष्ट करण्याची गरज भासत नाही. नागा चैतन्य आणि समंथा यांचा घटस्फोट झाल्यानंतर लगेचच चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या डेटिंग चर्चांना वेग आला.
नागा- चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या डेटिंगच्या चर्चांना तेव्हा निश्चिती मिळाली जेव्हा, नागा चैतन्यने सिद्धार्थ कन्ननसोबतच्या संभाषणात त्याच्या रिलेशनबद्दल माहिती सांगितली होती. जेव्हा सिद्धार्थने नागा चैतन्यला अभिनेत्री शोभितासोबत डेटिंगबद्दल विचारले तेव्हा, नागा चैतन्यने स्पष्टपणे उत्तर न देत फक्त, त्याने लाजत ’मी फक्त हसणार आहे.’ म्हणाला होता.
COMMENTS