अहमदनगर | नगर सह्याद्री स्पर्धा परीक्षाफ देऊन सरकारी नोकरीत जाणं, हाच आयुष्याला कलाटणी देण्यासाठीचा मंत्र असं वाटणार्यांची संख्या खूप मोठी...
अहमदनगर | नगर सह्याद्री
स्पर्धा परीक्षाफ देऊन सरकारी नोकरीत जाणं, हाच आयुष्याला कलाटणी देण्यासाठीचा मंत्र असं वाटणार्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यातही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा ओघ लक्षणीय आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणं आणि ती यशस्वीरीत्या पास करणं हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असतो. काहींना यश मिळते तर काहींना अपयश. वारंवार अपयश आल्यानं आपलं आयुष्य संपवण्यापर्यंतचे टोकाचे पाऊलही काही जण उचलतात. या स्पर्धेमुळं उभे राहणारे अनेक सामाजिक प्रश्नही मोठे आहेत. यावर भाष्य करणारा सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत, गोवर्धन दोलताडे लिखित-निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ममुसंडीफ हा मराठी चित्रपट येत्या २६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या चित्रपटात नायकाची भूमिका साकारणारे अभिनेते रोहन पाटील, मित्राची भूमिका साकारणारे अरबाज शेख, तानाजी गळगुंडे, रिल स्टार सुरज चव्हाण उर्फ गोळीगत, छोटा पुढारी घनश्याम दराडे, राधाकृष्ण कराळे इत्यादी कलावंत यावेळी उपस्थित होते.
या चित्रपटाचे काही चित्रीकरण कोपरगाव, कोकमठाण, जंगले महाराज आश्रम, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात झाले असून चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक गोवर्धन दोलताडे, दिग्दर्शक शिवाजी दोलताडे व मुख्य नायक रोहन पाटील हे कर्जत तालुयातील कोरेगाव येथील रहिवासी आहेत. या चित्रपटामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संन्मिता धापटे, वैष्णवी शिंदे, माणिक काळे, सुजित मगर, मयूर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राम गायकवाड, राधाकृष्ण कराळे, अजित पवार, उत्कर्ष देशमुख, सार्थक वाईकर, आर्यन पवार, निमिषा सानप, रुचिता देशमुख, प्रियांका पवार, ऐश्वर्या फटांगरे, श्रद्धा गायकवाड, आकांशा करपे, प्राजक्ता गायकवाड, मानसी डरंगे, भाग्यश्री पवार यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटास नगरकर रसिक प्रेक्षकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा असे आवाहन निर्माता दिग्दर्शक गोवर्धन दोलताडे व शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतात.
यासाठी योग्य मार्ग निवडला आणि मग तो मार्ग काढण्यासाठी मेहनत घेणे यातच यशाचे रहस्य लपलेलं असतं. स्पर्धेमध्ये अपयश आल्याने खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागण्याची जिद्दच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवेल, हा संदेश पोहचवणारा मुसंडी हा चित्रपट प्रत्येकाला आपल्यातल्या आत्मविश्वासाची जाणीव करून देईल. रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी मुसंडी चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे, सुरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक यांच्या भूमिका आहेत.
COMMENTS