पुणे। नगर सहयाद्री- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
पुणे। नगर सहयाद्री-
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केलंय. शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांनी तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कार्यकर्त्यांवर असं काही बोलू नये. असं मला वाटतं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,२ मेला शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर ५ मेला त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित पवार यांचा मागच्या चार महिन्यापासून माझा संपर्क झाला नाही किंवा ते आमच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात नाहीत हेच मी सांगत होतो. त्यांच्या महाविकास आघाडीकडूनच अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काही तीन दिवस झाले ते सगळं स्क्रिप्टेड होतं.
पुढे बोलताना म्हणाले, शरद पवार साहेबांनी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी घटना बदलली. राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत. ज्यांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत. शरद पवार दुसऱ्याला कसं पक्षाचा अध्यक्ष होऊ देतील? राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता आहे.
COMMENTS