सारोळा अडवाई येथे १ कोटी ३० लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन पारनेर | नगर सह्याद्री गेल्या अनेक वर्षापासून गावागावातील वाड्या-वस्त्य...
सारोळा अडवाई येथे १ कोटी ३० लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन
पारनेर | नगर सह्याद्री
गेल्या अनेक वर्षापासून गावागावातील वाड्या-वस्त्यांवरील शिवरस्त्याचा प्रश्न प्रलंबित असून तो मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. ग्रामीण भागात दळणवळणासाठी रस्त्यांची आवश्यकता असल्याने तालुयातील विविध रस्ते मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे. सारोळा अडवाई येथील शिवरस्त्यांचा प्रश्नही मार्गी लावू, असे आश्वासन आ. लंके यांनी दिले.
पारनेर तालुयातील सारोळा अडवाई येथील खोडदे बाबा मंदिर रस्त्यासाठी आमदार लंके यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी तीस लाख रुपये मंजूर झाले. रस्त्याच्या कामाचा प्रारंभ आ. लंके यांच्या हस्ते करण्यात आला. आ. लंके म्हणाले, ग्रामीण भागात रस्त्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण प्रयत्नशील असून जामगाव ते सारोळा अडवाई रस्त्यासाठीही १ कोटी ८२ लाखांचा निधी दिला आहे. या रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाठी दहा लाख रुपयांचा तसेच विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या इमारतीसाठीही दहा लाख रुपयांचा निधी दिला असून लवकरच या इमारतीचे लोकार्पण होणार आहे.
सारोळा अडवाई येथील ग्रामस्थांनी शिवरस्त्याची समस्या आ. लंके यांच्याकडे मांडली. यावर बोलताना आ. लंके म्हणाले, गावातील शिवरस्त्यांचा प्रश्नही आपण प्राधान्याने मार्गी लावणार आहोत. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, जिल्हा सरचिटणीस अशोक रोहोकले, सरपंच परशुराम फंड, चेअरमन शंकरराव महांडुळे, माजी सरपंच देविदास आबूज, नानाभाऊ फंड, दत्ता शिंदे, काशिनाथ फंड, भाऊसाहेब फंड, भाऊसाहेब आबुज, बाळासाहेब हिलाळ, मुकुंद शिंदे, संदीप रोहोकले, ठेकेदार सचिन गवारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS