अहमदनगर | नगर सह्याद्री भर रस्त्यात विवाहितेशी गैरवर्तन करणार्या तरूणाविरूद्ध बुधवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सावेडी उपनगरातील पी...
अहमदनगर | नगर सह्याद्री
भर रस्त्यात विवाहितेशी गैरवर्तन करणार्या तरूणाविरूद्ध बुधवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सावेडी उपनगरातील पीडित विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. दीपक शिंदे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नालेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
सावेडी उपनगरात मंगळवारी (दि. २३) ही घटना घडली. फिर्यादी विवाहिता एका खासगी रूग्णालयात काम करते. त्या मंगळवारी साडेअकरा वाजता त्यांच्या सासूकडे जाण्यास निघाल्या असता दुचाकीवरून (एमएच १६ सीबी ६०३) आलेल्या एका अनोळखी तरूणाने त्यांना रस्त्यात अडवून, चल माझ्या गाडीवर बस, असे म्हणाला. त्यावेळी फिर्यादीने त्याला तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला ओळखत नाही, असे म्हटले. तो फिर्यादीला म्हणाला, मी तुला ओळखतो तू कशाला घरी भांडण केले.
चल मी तुला घरी सोडतो. फिर्यादीने घाबरून आरडाओरडा केला असता तो निघून गेला. काही वेळाने फिर्यादी त्यांच्या सासूला घेऊन संबंधित ठिकाणी गेल्या असता तो तरूण तेथेच होता. त्याला जाब विचारला असता त्याने फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून मारहाण केली. फिर्यादीची सासू व नणंद यांनाही मारहाण केली. रस्त्याने ये जा करणार्या लोकांनी त्याला पकडले. काही वेळात पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने दीपक शिंदे असे नाव सांगितले आहे.
COMMENTS