नवी दिल्ली वृत्तसंस्था- चार दिवसांच्या मनधरणीनंतर आणि सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला आहे. कर्नाटक...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
चार दिवसांच्या मनधरणीनंतर आणि सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत बराच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आता हा गोंधळ संपला आहे. कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार हे स्पष्ट केलं आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, पत्रकार परिषद घेत काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची नावे जाहीर केली. ते म्हणाले की, सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील आणि डीके शिवकुमार हे एकमेव उपमुख्यमंत्री असतील, अशी घोषणा त्यांनी केली.
काँग्रेसच्या या घोषणेनंतर डीके शिवकुमार यांनीही याबाबत एक फोटो शेअर करत ट्वीट केलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यांचा आणि कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हातपकडून काँग्रेसमध्ये सर्व ठीक आहे, असं दाखवत आम्ही एकसोबत आहोत हे दर्शवत आहेत.
COMMENTS