अहमदनगर| नगर सहयाद्री - अहमदनगरमधून एक दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात जिल्हा परिषदेच्या दोन कर्मच...
अहमदनगर| नगर सहयाद्री -
अहमदनगरमधून एक दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ होत आहे. अशोक परसराम व्यवहारे (वय ५६) व विनायक कातोरे (वय ४३) असं मृत कर्मचाऱ्यांच नाव असून संतोष लंके हे जखमी आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी अशोक व्यवहारे, विनायक कातोरे, संतोष लंके हे शासकीय कामानिमित्त नाशिकहून अहमदनगरकडे येत असताना नगर मनमाड रोडवरील वांबोरी फाट्याजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार आणि ट्रक वेगात एकमेकांवर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार आणि ट्रक वेगात एकमेकांवर आदळले.
ट्रक आणि एक चारचाकी कारची सामोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कारमध्ये पुढे बसलेल्या दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
COMMENTS