मुंबई | नगर सहयाद्री बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या केरला स्टोरी चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आहे. चित्रपटाने भारतात सध्या १३६. ७४ कोटींच...
मुंबई | नगर सहयाद्री
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या केरला स्टोरी चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आहे. चित्रपटाने भारतात सध्या १३६. ७४ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. प्रत्येक चित्रपट करताना मला नेहमी असे वाटायचे की, महा माझा शेवटचा चित्रपट असेलफ. आगामी चित्रपटात मला भूमिका मिळेल की नाही, माहित नाही. प्रेक्षकांना माझी भूमिका आवडेल की नाही, त्यामुळे मी नेहमी प्रत्येक चित्रपट शेवटचा समजते. प्रत्येक चित्रपट करताना मला नेहमी असे वाटायचे की,हा माझा शेवटचा चित्रपट असेल आगामी चित्रपटात मला भूमिका मिळेल की नाही. प्रेक्षकांना माझी भूमिका आवडेल की नाही, त्यामुळे मी नेहमी प्रत्येक चित्रपट शेवटचा समजायचे.
माझ्यासाठी प्रेक्षकांची स्वप्नं नेहमीच मोठी होती. जसे की, प्रेक्षक म्हणायचे, अदाला ही किंवा ती भूमिका द्यायला हवी होती,पण मला वाटतंय, ती सर्व स्वप्नं आता सत्यात उतरत आहेत. मला कशा चांगल्या भूमिका मिळतील याची खात्री नव्हती. पण आता अखेर माझ्या भूमिका पाहून, अभिनय पाहून चांगले रोल मिळत आहेत.एवढंच नाही तर मला सिनेकारकिर्दित चांगली संधी मिळण्यासाठी ओम शांती ओम या चित्रपटातील शाहरुख खानसारखा पुनर्जन्म घ्यावा लागेल का, असा विचार पूर्वी माझ्या मनात अनेकदा हा विचार यायचा.
पण अखेर तशी संधी मिळाली आणि मला चांगला प्रोजेक्ट मिळाला. जेव्हा हा चित्रपट करत होते, त्यावेळी वाटत नव्हतं की, प्रेक्षक माझ्या या चित्रपटाचे इतके कौतुक करतील, पण अखेर स्वप्न सत्यात उतरत आहेत. द केरला स्टोरीने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ८.३ कोटींची कमाई केली होती. दुसर्या आठवड्यातील शनिवारी चित्रपटाने १९.५० कोटींची कमाई केलीय. तर एकट्या रविवारी चित्रपटाने २३.७५ कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे अदा शर्मा स्टारर मद केरला स्टोरीफने एकट्या भारतात सध्या १३६.७४ कोटींच्या आसपास कमाई केली आहे.
COMMENTS