सांगली । नगर सहयाद्री - सांगली जिल्ह्यामधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकल्याचा प्रियकराच्या मदतीने ...
सांगली । नगर सहयाद्री -
सांगली जिल्ह्यामधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकल्याचा प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना घडली आहे. या सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव निर्दयी मातेने केला होता. या प्रकरणात निर्दयी मातेसह प्रियकर विटा पोलिसांच्या ताब्यात आहेत.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,मृत मुलाची आई ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रूपेश घाडगे या तरुणाशी काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. ज्योती हीचे लग्न झाले असून तिला शौर्य हा सहा वर्षाचा मुलगा होता. ज्योती आणि रूपेश या दोघांना लग्न करायचे होते. परंतू या लग्नामध्ये चिमुकल्या शौर्यचा दोघांना अडथळा वाटत होता. त्यामुळे दोघांनी निर्दयपणे त्याचा काटा काढायचे ठरवले.रूपेशने शौर्यला दुचाकीवरून नेऊन एका विहिरीत त्याला फेकून दिले.
ज्योती लोंढे यांनी आपल्या चिमुकल्या शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याचा बनाव करत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान विहिरीत चिमुकल्या शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासात ज्योती आणि रूपेश या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधाची माहिती पुढे आली.. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी शौर्यचा खून केल्याची कबुली दिली.
COMMENTS