आपलं गाव फौंडेशन माध्यमातून पाण्याचा टँकर सुरु | अध्यक्ष सुरेश खणकर यांची माहिती निघोज | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील बाभूळवाडे येथील आदिव...
आपलं गाव फौंडेशन माध्यमातून पाण्याचा टँकर सुरु | अध्यक्ष सुरेश खणकर यांची माहिती
निघोज | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील बाभूळवाडे येथील आदिवासी वस्तीला दीड ते दोन किलोमीटर वरून डोंगरात उतरून पाणी आणावे लागते. ते पण पुरेसे मिळत नाही. जनावरांना, कपडे धुण्यासाठी अंघोळीसाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यांच्या परिस्थितीची पूर्ण माहिती घेऊन आपल गाव फौंडेशन माध्यमातून टँकर सुरु केला असल्याची माहिती फौंडेशन अध्यक्ष डॉ सुरेश खणकर यांनी दिली आहे.
पिण्यासाठी पुरेसे पाणी नव्हत. स्त्रिया, मुले डोयावर भांडी घेऊन दीड दोन किलोमीटर वरून पाणी आणत होते. ते पाणी पण पुरेसे नव्हत. त्या वाडीतील लोकांशी चर्चा केल्यावर त्यांनी पाण्याची काहीतरी सोय करावी अशी आम्हाला विनंती केली. ग्रामपंचायतने दोन महिन्यापूर्वी टँकर चा प्रस्ताव देऊनही शासन अजून पर्यंत टँकर सुरू झाला नाही. आदिवासी लोकांची पाणी समस्या दूर करावी म्हणून फाउंडेशन कडे असलेला टँकर वाडीत आणून त्या दीड किमी वरील विहिरी वर भरून आणण्याचे ठरवले.
त्याप्रमाणे टँकर ट्रॅटर ने ठाकरं वाडीत नेण्यात आला. तेथील दूरच्या विहिरीत भरून घरोघरी पाणी देण्यास सुरुवात झाली. ठाकर वाडीतील आदिवासी लोकांची पाणी समस्या दूर करण्यात यश आले. भरपूर पाणी मिळाल्यामुळे सर्व आदिवासी बांधव खुश झाले. हे शासन करू शकले नाही ते फाउंडेशनने करून दाखवले आहे. शासन मात्र फक्त कागदी घोडे नाचवत बसले आहे. प्रत्यक्ष समस्या मात्र सोडवण्यात लक्ष देत नाही याचा आदिवासी बांधवांना राग आला होता. स्थानिक प्रतिनिधी सुध्दा या कडे लक्ष देत नाही याचे वाईट वाटते.
लवकरच फाउंडेशन मार्फत त्यांची पाणी समस्या मिटवण्यासाठी कायमची योजना राबवण्याचा विचार आहे. बाभुळवाडे गावातील असलेल्या आदिवासी वाडीत दरवर्षी ८ महिने पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागते. म्हणजे तेथील परिस्थिती किती बिकट असेल याची कल्पना येते. अशी वाईट परिस्थिती असल्यामुळे सर्व लोक रोजगारासाठी दुसर्या गावात जातात किंवा बागायती गावात जाऊन खंडाने शेती करतात त्यांच्या शेतीची अवस्था फारच वाईट आहे ती असून नसल्यासारखी आहे.
तेथील लोकांना पाणी खूपच जपून वापरावे लागते. तिकडे मुंबई, पुणे यासारख्या शहरी भागात ४ते ६तास नळाला दररोज पाणी असते. शहरी लोकांना त्यामुळे पाणी कसे वापरावे याचा धडा या लोकांकडून मिळु शकेल. आपलं गाव फाऊंडेशन च्या पाठपुराव्यामुळे ग्रामपंचायती ने शासन दरबारी आदिवासी वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे.पण तो मंजूर होऊन कधी पाणी येईल हे देवच जाणे? अशी प्रतिक्रिया फौंडेशन अध्यक्ष डॉ. सुरेश खणकर व त्यांच्या सहकार्यांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS