नागपूर। नगर सहयाद्री - नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरात एकून १० ठिकाणी आयकर विभागाने छापे मारले आहेत. हवाला आणि कन्स्ट्रक्शनशी...
नागपूर। नगर सहयाद्री -
नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरात एकून १० ठिकाणी आयकर विभागाने छापे मारले आहेत. हवाला आणि कन्स्ट्रक्शनशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आलेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने नागपुरातील ८ते १० जणांच्या वेगवेगळ्या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहे. यामध्ये रवि अग्रवाल, लाला जैन, शैलेश लखोटिया, इज़राइल सेठ, तन्ना यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकत मुंबई सहित नागपूरच्या टीमने ही कारवाई केली आहे.
हे सर्व व्यावसायिक हवाला, बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत.त्यांच्या कंपन्यांमध्ये करविषयक आर्थिक अनियमितता झाल्यामुळे हे छापे पडल्याची माहिती आहे.१० हून अधिक ठिकाणी आयकराचे छापे पडले असून छापे टाकण्यासाठी मुंबईतील पथक पहाटे नागपुरात पोहोचले.
COMMENTS