अहमदनगर | नगर सह्याद्री धारदार कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करून पसार झालेल्या दोघांना कोतवाली पोलिसांनी केडगावातील एका हळदी कार्यक्रमातून त...
अहमदनगर | नगर सह्याद्री
धारदार कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करून पसार झालेल्या दोघांना कोतवाली पोलिसांनी केडगावातील एका हळदी कार्यक्रमातून ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
मंगेश कालीदत्त कांबळे (वय १९ रा. माधवनगर, केडगाव) व लक्ष्मीकांत उर्फ बाबा प्रकाश कावळे (वय २४ रा. अयोध्यानगर, केडगाव) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत. ११ मे रोजी रात्री शिंदेगल्ली, माळीवाडा परिसरात राहणारा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा व त्याचा मित्र दुचाकीवरून गायके मळा आगरकरमळ्या मार्गे नगर शहराकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला मागून दुसर्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धक्का दिला. अपघातात झालेल्या गाडीचे नुकसान भरून देतो, असे म्हणून कोयत्याचा धाक दाखवून लुटले होते. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यातील पसार दोघे केडगाव येथील एका हळदी कार्यक्रमासाठी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. त्यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तेथे पाठवून कारवाईचे आदेश दिले होते. पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्यांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले.
न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.ही कामगिरी निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, अमोल गाडे, याकुब सय्यद, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.
COMMENTS