मुंबई नगर सहयाद्री - आमच्या लिखाणाला महत्त्व द्या, असे मी कुठे म्हणतो? मी माझ्या पक्षाचे म्हणणे मांडत असतो. तुम्ही तुमचे म्हणणे मांडा. गेली ...
मुंबई नगर सहयाद्री -
आमच्या लिखाणाला महत्त्व द्या, असे मी कुठे म्हणतो? मी माझ्या पक्षाचे म्हणणे मांडत असतो. तुम्ही तुमचे म्हणणे मांडा. गेली ४० वर्षे आम्ही राजकीय भाष्य करत आहोत, यांची जाणीव ठेवा, अशा शब्दात खा. संजय राऊत यांनी शरद पवार यांना प्रतिउत्तर दिले आहे.
‘वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले’ असे ठाकरे गटाच्या मुखपत्रात म्हटले होते. त्यावर पवार यांनी अशा लिखाणाला आम्ही महत्त्व देत नाही, आम्ही दुर्लक्ष करतो, असे म्हटले होते. त्याला खा. राऊत यांनी प्रतिउत्तर देताना म्हटले, की शरद पवारांसोबत कुणी नव्हते, तेव्हा आम्ही तुमची बाजू घेतली. आता तुमच्याकडे काही असेल, तर बोलण्याची हिंमत ठेवा. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी हे उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी हल्लाबोल केला.
संजय राऊत म्हणाले, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडेच हे प्रकरण गेले पाहिजे. त्यांचा निर्णय दुसरा अध्यक्ष फिरवू शकत नाही. आमदार अपात्रतेचा निर्णय माझ्याचकडे येईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले होते. त्यावर बोलताना खा. राऊत म्हणाले, कायदा मंत्र्याने बंद दरवाजाआड बैठकीत काय सांगितले? तुमच्याकडेच प्रकरण येईल हे तुम्हाला कसे माहीत? ही कोणती दादागिरी? कायदा मंत्री तीन तास बंद दाराआड चर्चा करतात, हे काय चालले आहे? असे प्रश्न उपस्थित करत खा. राऊत यांनी नार्वेकर यांचाच राजीनामा मागितला.
COMMENTS