मांडव्यात २ कोटी रुपयांच्या जलजीवन मिशनचा शुभारंभ पारनेर | नगर सह्याद्री राजकारणामध्ये सत्ता येथे आणि जाते सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेल...
मांडव्यात २ कोटी रुपयांच्या जलजीवन मिशनचा शुभारंभ
पारनेर | नगर सह्याद्री
राजकारणामध्ये सत्ता येथे आणि जाते सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेला नाही. परंतु महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात ग्रामीण भागातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. परंतु या सरकारने मोठ्या प्रमाणात निधी आडवुन ठेवला आहे. त्यामुळे विकास कामांमध्ये सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा हल्लाबोल आमदार नीलेश लंके यांनी केला आहे.
मांडवे खुर्द येथे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १ कोटी ९९ लक्ष ७९ हजार नळ पाणीपुरवठा ह्या योजनेचा भव्यभूमिपूजन समारंभ आमदार लंके यांच्या हस्ते शनिवारी सकाळी संपन्न झाला.याच दिवशी मेजर दीपक विठ्ठल जाधव यांची मुंबई पोलीस दलात कु. काजल संतोष जाधव हिची पुणे पोलीस दलात कु. सुरज एकनाथ जाधव यांची पिंपरी चिंचवड पोलीस दलात, कु. प्रतीक्षा गणपत जाधव हिची बृहन्मुंबई नगरपालिकेत अग्निशामक दलात, कु. अश्विनी बाळासाहेब घागरे हिची आयसीआयसीआय बँक प्रोफेशनल ऑफिसर पदी, कु. रसिका बाळासाहेब जाधव हिची युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट मॅनेजर पदी तसेच कु.अद्वय बाळासाहेब हारदे याने इयत्ता बारावी मध्ये विज्ञान शाखेत ९२.५०% गुण मिळवून संगमनेर तालुयात प्रथम क्रमांक मिळवला या सर्व गुणवंतांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सन्मान मांडवे खुर्द गावच्या वतीने व आमदार लंके हस्ते करण्यात आला.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती उपसभापती व सर्व संचालकांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. सरपंच सोमनाथ आहेर यांनी पदभार स्वीकारल्यापासून आमदार लंके यांच्याकडे पाठपुरवठा करून गावासाठी सहा कोटी ५० लक्ष रुपये निधी मंजूर करून आणला. तत्पर कर्तव्यदक्ष सरपंच असल्यामुळे गावासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मी देऊ शकलो असे आमदार लंके यांनी सांगितले. कोणत्याही विकास कामात पक्षीय राजकारण न करता सर्व ग्रामस्थ एकजुटीने काम करतात याचेही कौतुक आमदारांनी आपल्या भाषणात केले.
तालुयातील गावपुढाराला ‘मी पणा’ची बाधा; झावरे
पारनेर तालुयातील फक्त एका गावात एका स्वयंघोषित गाव पुढार्याला मी पणाची बाधा झाली असून माझ्याशिवाय गावात काहीच होत नाही असा अहंभाव निर्माण झाला आहे. परंतु समाजकारणात, राजकारणात काम करत असताना ‘मी नव्हे तर आम्ही’ हे महत्त्वाचे असून आम्ही मुळे अनेक विकास कामे मार्गी लागतात. परंतु पारनेर तालुयातील वासुंदे गावातील गाव पुढार्याला मी पणाची बाधा झाली असल्याची टीका गुरुदत्त मस्टेट पर संस्थेची संस्थापक अध्यक्ष बा. ठ. झावरे यांनी मांडवे येथील विविध विकास कामाचे उद्घाटन प्रसंगी केली आहे.
तसेच मांडवे गावाला कधीही निधीची कमतरता पडणार नाही असे आश्वासन देऊन गावातील प्रमुख नागापूर रस्ता, बोरवाक रस्ता, काळेपाईन रस्ता ,पांढरी रस्ता, हनुमान मंदिर येथे सभामंडप देण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी पारनेर उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे, बाजार समिती माजी सभापती प्रशांत गायकवाड, अशोक कटारिया, बा. ठ. झावरे, भागोजी झावरे, गंगाराम बेलकर, बाळासाहेब नर्हे, मेघा रोकडे, बाळासाहेब खिलारी, उपसरपंच रामा तराळ, दत्ता निवडुंगे, सरपंच पियुष गाजरे, सरपंच राहुल झावरे, सरपंच आप्पासाहेब शिंदे, सरपंच संजय रोकडे, पोपट साळुंखे, सरपंच राजू रोडे, बबलू रोहकले, श्रीरंग रोकडे, डॉटर रावसाहेब आग्रे, नितीन ढोकळे, मोहन रोकडे, राजू रोकडे, योगेश शिंदे, पोपट दरेकर, संतोष टेकुडे, साकुर गावचे कोळपकर, सरपंच सोमनाथ आहेर, उपसरपंच मनीषाताई जाधव, ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील गागरे, गौतम बागुल, सागर पवार, रेश्मा गागरे, कमल गागरे, मंदाकिनी जाधव, पूजा गागरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच जगदीश पाटील गागरे, सुधीर जाधव यांनी केले. मान्यवरांचे आभार यशवंत भाऊ जाधव यांनी केले.
COMMENTS