अहमदनगर | नगर सह्याद्री अहमदनगर येथील अहमदनग प्रेस लबचे माजी अध्यक्ष नरहर बाळकृष्ण कोरडे यांचे अल्प आजाराने ३ मे रोजी निधन झाले. मृत्यू समय...
अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर येथील अहमदनग प्रेस लबचे माजी अध्यक्ष नरहर बाळकृष्ण कोरडे यांचे अल्प आजाराने ३ मे रोजी निधन झाले. मृत्यू समयी ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
नरहर कोरडे यांनी नगर टाइम्स या दैनिकात कार्यकारी संपादक म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. अंधसेवा मंडळ, रावसाहेब पटवर्धन स्मारक आदि संघटनेवर त्यांनी काम केले. अहमदनगर प्रेस लबचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यांच्या कारकिर्दीत अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.
पहिल्यापासूनच वाचन व लिखाणाची आवड असल्याने त्यांचे अनेक लेख हे प्रसिद्धही झाले आहेत. नगर टाइम्स या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी नगरच्या विविध समस्या सोडविण्याचा पाठपुरवा सातत्याने लिखाणाच्या माध्यमातून केला. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले होते. गेली ३० वर्षे पत्रकार क्षेत्राशी निगडीत होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा मोठा नावलौकिक होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS