तिन दिवसानंतर आरोपीला जेरबंद करण्यात भंडारा पोलिसांना यश... राजू आगलावे / नगर सह्याद्री - मनोरुग्ण असलेली महीला, घरी कुणालाही न सांगता त...
तिन दिवसानंतर आरोपीला जेरबंद करण्यात भंडारा पोलिसांना यश...
राजू आगलावे / नगर सह्याद्री -
मनोरुग्ण असलेली महीला, घरी कुणालाही न सांगता ती निघून गेली असता, महीलेच्या मनोरुग्ण अवस्थेचा फायदा घेवून तिच्यावर बलत्कार करणाऱ्या, आरोपी आटोरिक्षा चालकाला भंडारा पोलिसांनी शोधून काढले व चौकशीत पोलिसीय हीसका दाखवताच, त्याने गुन्हा कबुल केल्याने, तिन दिवसानंतर सदर घटनेतील नराधम आरोपीला अटक करुन भंडारा पोलिसांनी यश मिळविले आहे. बसुराज पंढरी नंदेश्वर वय (५७) रा. रमाबाई आंबेडकर वॉर्ड, भंडारा असे आटोरिक्षा चालक नराधमाचे नाव आहे.
पिडित महीला ही दिनांक २८ एप्रिल रोजी, घरी कुणालाही न सांगता घरुन निघुन गेल्याने तिच्या कुटूंबियांनी तिचा शोध घेतला असता, ती मिळून न आल्याने दिनाक ३0 एप्रिल रोजी ती बेपत्ता असल्याची तक्रार कुटूंबियांनी, भंडारा पोलिस स्टेशन येथे दाखल केली होती. दरम्यान त्याच दिवशी दुपारी ३ वाजताच्या सुमारास भंडारा नजिकच्या गणेशपूर येथील स्मशानभूमी जवळील सुरक्षा भिंतीजवळ ती विवस्त्र अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची तपासणी केल्यानंतर तिच्या शरिरावर आंतभाग आणि बाह्यभागावर जखमा आढळून आल्याने, प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता,भंडारा पोलिसानी तपासाला गती दिली असता, मनोरुग्ण महीलेचे कपडे घटना स्थळापासून ५0 मीटर अंतरावर आढळल्याने, तिचेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (२) (जे), ३७६ (२) (आय), ३५४ (बी), २0१ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. आणि आरोपीला पकडण्यासाठी भंडारा शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथक नेमण्यात आले असता, पथकाने तपासात शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी नराधम आटोरिक्षा चालक बसुराज नंदेश्वर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक रश्मीता राव यांच्या मार्गदर्शनात भंडारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक कर्हाडे, महिला पोलिस उपनिरीक्षक उईके यांचेसह पथकातील अन्य कर्मचारी आदींनी केली.
COMMENTS