मुंबई|नगर सहयाद्री अभिनेत्री सोनम बाजवा हिने २०१३ साली बेस्ट ऑफ लक’ या पंजाबी चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर चित्रपटसृष्टीत तीची लोकप्र...
मुंबई|नगर सहयाद्री
अभिनेत्री सोनम बाजवा हिने २०१३ साली बेस्ट ऑफ लक’ या पंजाबी चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर चित्रपटसृष्टीत तीची लोकप्रियता वाढली. याचवर्षी या चित्रपटसृष्टीत तिला १० वर्षं पूर्ण झाली आहेत. यानिमित्त सोनमने एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या चित्रपटसृष्टीतील अनुभवांबद्दल खुलासा केला आहे.
शिवाय तिला आजवर कोणत्या भूमिका मिळाल्या आणि तिला चित्रपटात किसिंग सीन द्यायची भीती वाटते यावारही भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये सोनमला हॅप्पी न्यू इयर’ या फराह खानच्या चित्रपटात दीपिका पदूकोणच्या भूमिकेसाठी विचारलं होतं हे स्पष्ट झालं. नंतर काही कारणास्तव तिच्याऐवजी दीपिका पदूकोणला घेतले. शिवाय २०१९ चा आयुष्मान खुरानाच्या बाला’ आणि २०२० च्या स्ट्रीट डान्सर ३ डी’ या चित्रपटातही सोनमने छोटी भूमिका केली होती.
नंतर सोनमने आपला मोर्चा पंजाबी चित्रपटसृष्टीकडे वळवला. याबरोबरच चित्रपटातील कीसिंग सीनबद्दल फिल्म कंपॅनीयन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनम म्हणाली, बॉलिवूडच्या चित्रपटांत काही गोष्टी करायला मी नकार दिला आहे. त्या गोष्टी पंजाबमधील माझ्या चाहत्यांनी पहिल्या तर त्यांना वाईट वाटू शकतं. यामुळेच मी चित्रपटात कीसिंग सीन द्यायला घाबरते. कारण माझे चाहते आणि कुटुंबीय त्याकडे कसं बघतील याची मला चिंता वाटते.
हा सीन त्या कथेची गरज आहे हे त्यांना कदाचित पटकन समजणार नाही. त्यामुळे मी असे सीन्स देत नाही. सोनम बाजवा आता पंजाबी चित्रपट कॅरी ऑन जट्टा ३’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण युकेमध्ये पार पडलं आहे. या चित्रपटात गीप्पी ग्रेवाल, गुरप्रीत घुग्गी, बिन्नू ढिल्लों, नासिर चिन्योती हे कलाकारही दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
COMMENTS