हिंगोली। नगर सहयाद्री पोटच्या गोळ्याकडून मायलेकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना कळमनुरी तालुक्यात घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे क...
हिंगोली। नगर सहयाद्री
पोटच्या गोळ्याकडून मायलेकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना कळमनुरी तालुक्यात घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे का देत नाही या कारणावरून दारू पिऊन आलेल्या मुलाने वडिलांचे हातपाय बांधून आईवर अत्याचार केल्याचे घटना घडली आहे पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून नराधम मुलाला अटक केली.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर येथील एक कुटुंब रोज मजुरी करते. घरी एक मुलगा व पती-पत्नी असे तिघे जण राहतात. या दांपत्याचा २७ वर्षीय मुलगा दारूच्या आहारी गेला होता. ताे राेज आई-वडिलांना दारू पिण्यासाठी पैसे मागत असे. दरम्यान, शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तो मुलगा दारू पिऊन घरी आला.
दारू पिण्यासाठी पैसे का दिले नाही म्हणून दारूच्या नशेत त्याने भांडण करण्यास सुरवात केली. विशेष म्हणजे, नराधम मुलाने आपल्या वडिलांचे हातपाय बांधले त्यानंतर दारूच्या नशेत जन्मदात्या आईवर अत्याचार केला. या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले. संतापलेल्या आईने आज रात्री उशिरा कळमनुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS