पारनेर | नगर सह्याद्री आईच्या वर्षश्राद्धला माजी सरपंच सुरेश बोरुडे यांनी सामाजिक उपक्रमाची जोड देत गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणि...
पारनेर | नगर सह्याद्री
आईच्या वर्षश्राद्धला माजी सरपंच सुरेश बोरुडे यांनी सामाजिक उपक्रमाची जोड देत गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मातृत्वाला आदरांजली वाहण्याचा उपक्रम आदर्श आहे, असे गौरवोद्गार माजी सभापती काशिनाथ दाते यांनी काढले. पुढील काळात बोरुडे परिवाराचा हा उपक्रम समाजाने राबवावा, असे आवाहन दाते यांनी केले.
तालुयातील नारायणगव्हाण येथील सामाजिक कार्यकर्ते, पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे व्हा. चेअरमन सुरेश बोरूडे यांच्या मातोश्री विठाबाई बबन बोरूडे यांचे प्रथम वर्षश्राद्ध निमित्त गरजूंना वह्या वाटपाचा कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे जलसंधारण सदस्य राहुल पाटील शिंदे, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, भाळवणी सरपंच सौ लिलाबाई रोहोकले, रावसाहेब रोहोकले, सरपंच मनोज मुंगसे, विक्रम कळमकर, सागर मैंड, सुभाष थोरात, उपस्थित होते. वर्षश्राद्ध निमित्त हभप श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी) यांचे किर्तन झाले.
दाते म्हणाले, बोरूडे माझ्याबरोबर गेली पंधरा वर्षापासून काम करतात. हे एक वेगळे व्यक्तिमत्व आहे. खर्या अर्थाने जे घडले ते आईची कृपा आहे. आईच्या कष्टाची जाणीव ठेवणारे मुले जन्माला आली की समाधान वाटते. तसे हे दोन्ही बंधू, संपूर्ण परिवार अतिशय कष्टातून उभा राहिला. त्या कष्टाचे चीज म्हणून आपण काहीतरी मोठे व्हावे, मोठे झाल्यानंतर आपल्या जवळ आहे त्यात इतरांचाही वाटा आहे, ही दातृत्वाची भावना बोरूडे कुटुंबीयांची आहे. आज आईच्या वर्षश्राद्धनिमित्त गरजू मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या. मातृत्वाला शालेय साहित्य वाटप करून त्यांनी खरी आदरांजली वाहिली. या अगोदरही कपडे वाटप त्यांनी केले.
नारायणगव्हाणमध्ये गरजूंना आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले होते. असे अनेक उपक्रम त्यांनी या परिसरात केले. परिसरात प्रत्येक ठिकाणी मदत करण्याची भावना त्यांची असते, हे खरे आईचेच संस्कार. त्यामुळे बोरूडे यांना त्यांच्या आईच्या प्रेमामुळे भविष्यात कुठलीही कमतरता पडणार नाही, याची मला खात्री आहे. यावेळी राहुल पाटील शिंदे, कर्नल साहेबराव शेळके, पद्मजा पठारे, सरपंच संतोष शेळके, विकास रोहोकले, आर. एस. कापसे यांनी आदरांजली वाहिली. कार्यक्रमास मेजर सतीश गाडेकर, माजी चेअरमन बाळासाहेब सोबले, लक्ष्मण डेरे, पांडुरंग भांदिगरे, राजु औटी, नितीन कोहकडे, अरुण चिपाडे, सतीश चिपाडे, विनायक काकडे, सचिन शेळके, हुसेन शेख, विष्णू दरेकर, जयसिंग धोत्रे, संतोष शेळके, रामभाऊ शेळके, भाऊसाहेब शेळके, विठ्ठलराव पोटघन, दत्तात्रय ढोरमले आदी उपस्थित होते.
COMMENTS