मुंबई। नगर सहयाद्री - मे महिन्याच्या शेवटी सर्वांनाच मान्सूनचे वेध लागतात. यंदा तर कडाक्याचं ऊन आणि उष्णता यामुळे मान्सून कधी दाखल होणार याच...
मुंबई। नगर सहयाद्री -
मे महिन्याच्या शेवटी सर्वांनाच मान्सूनचे वेध लागतात. यंदा तर कडाक्याचं ऊन आणि उष्णता यामुळे मान्सून कधी दाखल होणार याची वाटच लोक पाहत आहेत. शेतकऱ्यांचे डोळे देखील आता आभाळाकडे लागले आहेत. या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुढील दोन दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस राज्यात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात कोकणात मान्सूनपूर्व पाऊस दाखल होणार आहे. सध्या मान्सून अंदमान निकोबारकडे वेगाने वाटचाल करत आहे. त्यामुळे केरळमध्ये 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो आणि यामुळे राज्यातही 7 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव असेल असा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
COMMENTS